आजपासून दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला
By Admin | Published: January 1, 2016 01:16 AM2016-01-01T01:16:21+5:302016-01-01T01:16:21+5:30
राजधानीत १ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या सम-विषम (आॅड-इव्हन) कार फॉर्म्युल्याची गुरुवारी काही तासांसाठी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत घेण्यात येणार होती.
नवी दिल्ली : राजधानीत १ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या सम-विषम (आॅड-इव्हन) कार फॉर्म्युल्याची गुरुवारी काही तासांसाठी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत घेण्यात येणार होती. पण काही कारणांमुळे दीड तास उशिराने सुरू झाली. ही चाचणी यशस्वी ठरली. त्यात पाच हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला. सर्व स्वयंसेवक पोलिसांच्या निगराणीत काम करीत होते. त्यांना दिल्लीच्या प्रमुख २०० चेक पॉर्इंटवर तैनात करण्यात आले होते, अशी माहिती विशेष आयुक्त (वाहतूक पोलीस) मुक्तेश चंदर यांनी दिली. परिवहनमंत्री गोपाल राय यांनीही या चाचणीची पाहणी केली. दिल्ली सरकारच्या या सम-विषम फॉर्म्युल्यानुसार सम आणि विषम नंबरच्या कार दिवसाआड धावतील.