आजपासून करा काळा पैसा पांढरा

By admin | Published: June 1, 2016 03:48 AM2016-06-01T03:48:27+5:302016-06-01T03:48:27+5:30

देशात काळा पैसा बाळगणाऱ्यांना तो कायदेशीर करून घेण्यासाठी चार महिन्यांच्या मुदतीची योजना एक जूनपासून सुरू होत आहे.

From today, black money is white | आजपासून करा काळा पैसा पांढरा

आजपासून करा काळा पैसा पांढरा

Next

नवी दिल्ली : देशात काळा पैसा बाळगणाऱ्यांना तो कायदेशीर करून घेण्यासाठी चार महिन्यांच्या मुदतीची योजना एक जूनपासून सुरू होत आहे. या योजनेनुसार त्या काळ््या पैशांवरील कर आणि दंड मिळून ४५ टक्के रक्कम भरावी लागेल. भ्रष्ट मार्गांनी पैसा गोळा केलल्यांना या योजनेचा लाभ घेऊ दिला जाणार नाही. उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेनुसार (इन्कम डिक्लेरेशन स्कीम) व्यक्तिला (डिक्लेरंट) बेहिशोबी संपत्ती कर, दंड आणि जास्त आकार (सरचार्ज) मिळून एकूण ४५ टक्के रक्कम ३० नोव्हेंबरपर्यंत भरावी लागेल.
डिस्क्लोजर विंडो योजनेबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचे अधिकारीही आॅनलाईन चर्चा करणार आहेत. याआधी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वारंवार विचारले जाणारे १४ प्रश्न तयार केले व उत्पन्न जाहीर करण्याच्या या योजनेतील तरतुदी काय आहेत हे सांगणारे परिपत्रकही जाहीर केले. या योजनेखाली डिक्लेरेशन दिलेल्या माहितीचा वापर ती देणाऱ्याविरुद्ध आयकर कायदा किंवा संपत्ती कर कायद्यासाठी केली जाणार नाही.

Web Title: From today, black money is white

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.