आजपासून शहरात हेल्मेट सक्ती

By Admin | Published: February 1, 2016 12:03 AM2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30

कारवाईचा बडगा : प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखासह २० जणांचे पथक

From today helmets forced to the city | आजपासून शहरात हेल्मेट सक्ती

आजपासून शहरात हेल्मेट सक्ती

googlenewsNext
रवाईचा बडगा : प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखासह २० जणांचे पथक
औरंगाबाद : शहरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. हेल्मेट न वापरणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच १५ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांसह सुमारे सहाशे पोलीस रस्त्यावर उतरणार आहेत. हे पोलीस दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. हेल्मेट सक्तीचा दुचाकीचालकांनी धसका घेतला असून, मागील दोन-तीन दिवसांपासून शहरातील विविध दुकानांवर हेल्मेट खरेदीसाठी अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरात वेगवेगळ्या भागात होणार्‍या अपघातात दरवर्षी १७० हून अधिक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरले तर किमान जीव वाचण्याची शक्यता जास्त असते. औरंगाबादकरांना नियमित हेल्मेट वापरण्याची अजिबात सवय नाही. त्यामुळे पोलिसांना दरवेळी सक्तीची मोहीम राबवावी लागते. सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचावे एवढीच प्रामाणिक इच्छा पोलिसांची आजपर्यंत राहिलेली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार शहरात मागील दोन महिन्यांपासून हेल्मेटचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याबद्दल जनजागृती करीत आहेत. या जनजागरणामुळे शहरातील अनेक महाविद्यालयांनी तसेच औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी कामगारांना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले. त्यामुळे शहरात हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हेल्मेट न वापरणार्‍या दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे १ फे ब्रुवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
चौका, चौकांत कारवाई
हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली आहे. शहरातील प्रत्येक चौकात, तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा रस्त्याच्या ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी वाहतूक शाखेतील सुमारे २२५ पोलीस रस्त्यावर असतील. शहरातील पंधरा पोलीस ठाणेप्रमुखांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक ठाण्याचे वीस कर्मचारी हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप आटोले यांनी सांगितले.

अपूर्ण....

Web Title: From today helmets forced to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.