आज नरक चतुर्दशी अभ्यंगस्नानाची पर्वणी : अनन्य महत्त्व

By admin | Published: October 29, 2016 01:07 AM2016-10-29T01:07:26+5:302016-10-29T01:07:26+5:30

नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे.

Today, the mountain of Abhaynagana with unique importance: unique importance | आज नरक चतुर्दशी अभ्यंगस्नानाची पर्वणी : अनन्य महत्त्व

आज नरक चतुर्दशी अभ्यंगस्नानाची पर्वणी : अनन्य महत्त्व

Next
िराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे.
भगवान श्रीकृष्णांनी अत्याचारी व दुराचारी दुर्दात्त असूर नरकासुराचा वध याच दिवसाला केला होता व सोळा हजार एक कन्यांना नरकासुराच्या बंदीगृहातून मुक्त करून त्यांना सन्मान प्रदान केला होता. याबाबत अजून एक कथाभाग आहे. रंति देव नामक एक पुण्यात्मा राजा होता. त्याने पाप कर्माला स्पर्श केला नव्हता. मात्र मृत्यूसमयी त्याच्या समक्ष यमदूत आल्याने राजन् म्हणाले की, तुम्ही मला नरकात नेण्यासाठी का आले. मी कोणतेही अकर्म केले नाही. त्यावेळी यमदुतांनी त्यांचा लेखाजोखा वर्णन केला व भिक्षा न दिल्याने तो भुखी आपल्या दरबारातून गेला. त्यामुळे आपणास ही वेळ आली. त्यावेळी राजाने मला आता मृत्यूदंड देऊ नका, अशी प्रार्थना केली. राजाने आपली समस्या ऋषीमुनीला सांगितली. त्यावर त्यांनी उपाय दिला. कृष्ण चतुर्दशी व्रत सांगितले. त्यानुसार राजाने व्रत आचरण केले. विष्णुकृपेमुळे तो पापमुक्त झाला.
तसेच अनंत चतुर्दशीला खूप गर्व झाला म्हणून तिला या दिवशी नरकात टाकले. म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पुढे तिचा उद्धार कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला झाला. असा संदर्भ आहे.
आज नरक चतुर्दशीला पहाटे- सूयार्ेदयापूर्वी उठून मंगल अभ्यंगस्नान करावे. आंघोळ करताना सुगंधित उटणे, सवासिक तेल, दिवा (मीठ, तेल व हळद घालून) तयार करावा. अर्धी आंघोळ झाल्यावर आंघोळ करणार्‍याचे औक्षण करावे. जो कोणी या दिवशी सूयार्ेदयापूर्वी अभ्यंगस्नान करत नाही तो भयंकर नरकात जातो व यातना भोगतो, अशी भावना आहे. अभ्यंगस्नानानंतर देवदर्शन कृष्णपूजन दर्शनाला अनन्य महत्त्व आहे. दीपदान ही करण्यात येते.
नरक चतुर्दशीला पहाटे अलक्ष्मीचे मर्दन करून आपल्यातील नरकरुपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.
नरक चतुर्दशीचा महिमा व महत्त्व अनन्य आहे. (वार्ताहर)

अभ्यंगस्नान- पहाटे ४.३० ते ६ वा.

Web Title: Today, the mountain of Abhaynagana with unique importance: unique importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.