आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते - राहुल गांधी

By admin | Published: December 1, 2015 06:07 PM2015-12-01T18:07:43+5:302015-12-01T18:07:43+5:30

आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते असे मत राहूल गांधी यांनी मांडले ते असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत आक्रमकपणे बोलत होते.

Today, protests and protests in India are seen as treason - Rahul Gandhi | आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते - राहुल गांधी

आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते - राहुल गांधी

Next
>ऑनलाईन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १ - आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते असे मत राहूल गांधी यांनी मांडले ते असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत आक्रमकपणे बोलत होते. लोकांना मत मांडण्याच्या अधिकारामुळेच भारत यशस्वी, तर जनतेचा आवाज दाबल्यामुळेच पाकिस्तान अपयशी ठरत आहे. सहिष्णुता ही भारताची शक्ती आहे तर असहिष्णुता ही पाकिस्तानची कमजोरी आसल्याच परखड मत त्यांनी मांडले. 
गुजरात मध्ये काय झाले? गुजरात मॉडेलचा फुगा फुटला, पाटीदार समाजाने आंदोलन पुकारलं, सरकारने २० हजार जणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. असे बोलत मोदीच्या गुजरात मॉडेलची खिल्ली उडवली
 
राहूल गांधी  यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे -
> अरुण जेटली म्हणतात आंदोलनाची निर्मिती केली जाते.अरुणजी हे तुमच्या मेक इन इंडियासारखे स्वप्न नाही हे वास्तव आहे
> तुम्ही स्कील इंडियाबद्दल बोलता,पण FTII च्या अध्यक्षपदी पात्रता नसलेली व्यक्ती बसवली, त्यामुळेच विद्यार्थी संपावर गेले
> पंतप्रधान आर्थिक विकास व प्रगतीबाबत बोलतात, पण त्याचवेळी त्यांचे सहकारी बॉलिवूड कलाकारांना पाकिस्तानात पाठवण्याची भाषा करतात
> देशातल्या सध्याच्या वातावरणामुळेच लेखक, तज्ज्ञांनी पुरस्कार परत केले, पण अरूण जेटली त्याला बनाव समजतात
> दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींची कट्टरतावाद्यांनी हत्या केली, त्याबाबत पंतप्रधानांचं मौन का? 

Web Title: Today, protests and protests in India are seen as treason - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.