ंंमहापौर पदाची आज निवड बिनविरोधचे संकेत: ला,चव्हाण, कोल्हे,गेही रिंगणात
By admin | Published: March 10, 2016 12:26 AM2016-03-10T00:26:16+5:302016-03-10T00:26:16+5:30
जळगाव : महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी महापालिकेतील गुरुवारी १० रोजी विशेष महासभा होत आहे. महापौरपदासाठी खान्देश विकास आघाडीचे नितीन ला, भाजपाच्या ज्योती चव्हाण, उपमहापौरपदासाठी मनसेचे ललित कोल्हे व भाजपाचे विजय गेही यांचे उमेदवारी अर्ज आहे. संख्याबळाचे समिकरण शक्य होत नसल्याने भाजपाचे उमेदवार ऐनवळी माघार घेण्याची शक्यता बुधवारी व्यक्त केली जात होती. त्यामुळे ही निवडप्रक्रिया बिनविरोध होण्याचे संकेत आहेत.
Next
ज गाव : महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी महापालिकेतील गुरुवारी १० रोजी विशेष महासभा होत आहे. महापौरपदासाठी खान्देश विकास आघाडीचे नितीन ला, भाजपाच्या ज्योती चव्हाण, उपमहापौरपदासाठी मनसेचे ललित कोल्हे व भाजपाचे विजय गेही यांचे उमेदवारी अर्ज आहे. संख्याबळाचे समिकरण शक्य होत नसल्याने भाजपाचे उमेदवार ऐनवळी माघार घेण्याची शक्यता बुधवारी व्यक्त केली जात होती. त्यामुळे ही निवडप्रक्रिया बिनविरोध होण्याचे संकेत आहेत. महापालिका स्थापनेनंतर .....व्या महापौर निवडीची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरू झाली. प्रारंभी भाजपा पुर्ण ताकद लावून निवडणूक मैदानात उतरेल असे संकेत होते. मात्र नंतरच्या टप्प्यात ही आशा मावळली. खाविआची मोर्चे बांधणी यशस्वी७५ सदस्य संख्या असलेल्या जळगाव महापालिकेत खान्देश विकास आघाडीचे सर्वाधिक ३२ सदस्य आहे. त्यांना मनसे (१२) , जनक्रांती (२), शिवसेना (१) ने पाठिंबा दिल्याने ही संख्या ४७ वर पोहोचली. नंतर राष्ट्रवादीने (११) पाठिंबा दिल्याने खाविआ गट अधिकच बळकट झाला. सद्य स्थितीत या गटाकडे ५८ सदस्य आहेत. तरीही साधगिरीचा उपाय म्हणून राष्ट्रवादीच्या १० सदस्यांना सहलीस पाठविण्यात आले. भाजपा एकाकीप्रारंभी राष्ट्रवादी भाजपाला साथ देईल असे अंदाज वर्तविले जात होते. मात्र हे समिकरण जुळून न आल्याने भाजपा गट एकाकी पडला. त्यामुळे उद्या होणार्या मतदान प्रक्रियेच्या प्रारंभीच या पक्षाचे उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे ही निवड प्रक्रिया बिनविरोध होऊन ला व कोल्हे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ----इन्फोगटनिहाय बलाबलमनपातील एकूण सदस्य-७५(बहुमतासाठी लागणारे संख्याबळ-३८ )खाविआ-३२भाजपा -१५मनसे- १२राष्ट्रवादी-११ जनक्रांती-२शिवसेना-१मविआ-१अपक्ष-१------इन्फो....अशी होईल निवड प्रक्रियासकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी दाखल अर्जांची छाननी होईल. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. या वेळात कोणी माघार न घेतल्यास मतदान प्रक्रिया होईल. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल या उपस्थित असतील.