Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:05 AM2020-06-09T11:05:51+5:302020-06-09T11:07:47+5:30
Today's Fuel Price: कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी दिल्ली - सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंगळवारी (9 जून) पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. दिल्लीत आज पेट्रोल 54 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे दिल्लीकरांना पेट्रोलसाठी 73 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 58 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 71.17 रुपयांवर गेला आहे.
मुंबईतही पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 52 पैशांनी तर डिझेलचे दर 55 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 80.01 रुपये आणि 69.92 रुपये मोजावे लागतील. गेल्या 80 दिवसांत पहिल्यांदा रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा महाग झाले आहे.
Petrol and diesel prices at Rs 73.00/litre (increase by Rs 0.54) & Rs 71.17/litre (increase by Rs 0.58), respectively in Delhi. Petrol and diesel prices at Rs 80.01/litre (increase by Rs 0.52) & Rs 69.92/litre (increase by Rs 0.55), respectively in Mumbai. pic.twitter.com/Ol5b5wQO4c
— ANI (@ANI) June 9, 2020
सरकारी तेल कंपन्या असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान ऑईल कॉर्पोरेशन यांनी गेले 82 दिवस इंधनाच्या दरांचा दररोज घेतला जाणारा आढावा बंद ठेवला होता. मात्र रविवारपासून अचानक या कंपन्यांची हा आढावा पुन्हा सुरू करून दरवाढ जाहीर केली आहे. सरकारने 14 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये वाढ केली, मात्र तेल कंपन्यांनी ही वाढ ग्राहकांवर न टाकता स्वत: सोसत असल्याचे जाहीर केले.
CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी https://t.co/KRTgaolc2G#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 9, 2020
त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिजतेलाच्या किमती दोन दशकामधील नीचांकी आल्या तरी या कंपन्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना न देता किमती कायम ठेवल्या होत्या. या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झालेल्या दरांचा लाभ ग्राहकांना न मिळता कंपन्यांनी आपला नफा वाढविण्याला प्राधान्य दिलेले दिसले. भारत आपल्या गरजेपैकी 85 टक्के खनिजतेलाची आयात करीत असतो. 16 जून 2017 पासून दररोजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांप्रमाणे देशातील इंधनाचे दर ठरविले जात होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमधील अस्थिरता बघून भारतामधील दर गोठविण्यात आले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
CoronaVirus News : कोरोनाची लक्षणं नसलेल्या अनेकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जागतिक आरोग्य संघटनेने केला 'हा' खुलासाhttps://t.co/ozjSO2PbYh#COVIDUpdates#COVID__19#CoronavirusCrisis#CoronaUpdates#Coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) June 9, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!
CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना पसरतो का?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती
बापरे! दोन महिन्यांत तब्बल 14 धक्के; दिल्लीत मोठ्या भूकंपाचे संकेत?
'इम्रान खानपेक्षा आदित्यनाथांचं नेतृत्व चांगलं'; पाकिस्तानात योगींचं भरभरून कौतुक
गुगल सर्चमध्ये दिसताहेत Whatsapp नंबर; कोणीही करू शकतं मेसेज पण कसं...
"...म्हणून चीनी मालावर बहिष्काराचा 'सर्जिकल स्ट्राईक' हवाच"
CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी