Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 09:39 AM2020-06-18T09:39:38+5:302020-06-18T09:54:43+5:30
Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका उडाला असून दरवाढ सुरुच आहे. सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामन करत असताना लोकांच्या खिशावरील भार वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडाला असून दरवाढ सुरुच आहे. सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत गुरुवारी (18 जून) पेट्रोल 0.51 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 84.66 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 0.61 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 74.93 रुपयांवर गेला आहे.
लॉकडाऊनमध्ये इंधनाचे दर वाढत नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 53 पैशांनी तर डिझेलचे दर 64 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 77.81 रुपये आणि 76.43 रुपये मोजावे लागतील.
Petrol and diesel prices at Rs 77.81/litre (increase by Re 0.53) and Rs 76.43/litre (increase by Re 0.64), respectively in Delhi today. pic.twitter.com/nkCvsbZkuT
— ANI (@ANI) June 18, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमती या आणखी 2 आठवडे रोज वाढत राहतील. इंधनाच्या किरकोळ किंमतीमध्ये 8 रुपयांपर्यंतची वाढ करून लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी अशी तेल कंपन्यांची योजना राहील. तेल कंपन्यांनी 16 मार्च नंतर 83 दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतही वाढ केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये राज्यांनी व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) मध्ये वाढ केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी कोणती वाढ केली नव्हती.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)
मार्चमध्ये सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 3 रुपये प्रति लीटरने वाढवली होती. त्यानंतर सुद्धा तेल कंपन्यांनी किेमतीमध्ये टॅक्स वाढवला नव्हता. त्यामुळे आता त्यांच्याकडून रोज पेट्रोलच्या किमती वाढवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी देखील वाढली आहे. तसेच घसरणारे रूपयाचे मूल्य तेल कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. लॉकडाऊनमध्ये तेल कंपन्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्यासाठी नुकसान भरपाई करण्यासाठी तेल कंपन्या प्रयत्नशील आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : चिंताजनक! 'हे' आजार असलेल्यांसाठी कोरोना सर्वाधिक घातक; वेळीच व्हा सावधhttps://t.co/TRPMu1ZQyD#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#health
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका
CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात
एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी