दौंड तालुक्यात आजपासून सरपंच-उपसरपंचांची निवड
By admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:02+5:302015-08-20T22:10:02+5:30
दौंड : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. त्यानुसार पुढीलप्रमाणे तीन दिवसांत सरपंच-उपसरपंचांची निवड होणार आहे.
Next
द ंड : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. त्यानुसार पुढीलप्रमाणे तीन दिवसांत सरपंच-उपसरपंचांची निवड होणार आहे. शुक्रवार (दि. २१) : भरतगाव, बोरीबेल, बोरीपार्धी, गलांडवाडी, हातवळण, हिंगणीगाडा, खडकी, कुसेगाव, कौठडी, लिंगाळी, मिरवडी, नानवीज, पाटस, रावणगाव, सहजपूर, शिरापूर, सोनवडी, स्वामी चिंचोली, ताम्हणवाडी, वरवंड, वाळकी, यवत, हिंगणीबेर्डी, गोपाळवाडी, पिंपळगाव व टाकळी. रविवार (दि. २३) : आलेगाव, भांडगाव, देऊळगाव गाडा, कडेठाण, कासुर्डी, खोर, कोरेगाव भिवर, मळद, नानगाव व उंडवडी.सोमवार (दि. २४) : कानगाव, राजेगाव, गार, गिरीम, खामगाव, खानोटा, खोरवडी, खुटबाव, लडकतवाडी, नंदादेवी, पडवी, पेडगाव, वडगाव दरेकर. या गावांच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत. दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती (महिला) : मिरवडी, नानवीज, हिंगणीबेर्डी, कडेठाण. अनुसूचित जाती : गोपाळवाडी, गार. अनुसूचित जमाती : शिरापूर. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : बोरीबेल, हातवळण, लिंगाळी, सोनवडी, वाळकी, यवत, टाकळी, भांडगाव, देऊळगाव गाडा. नागरिकांचा मागास प्रवर्ग : भरतगाव, पाटस, रावणगाव, सहजपूर, ताम्हाणवाडी, वरवंड, कानगाव, नंदादेवी, वडगाव दरेकर. सर्वसाधारण (महिला) : बोरीपार्धी, गलांडवाडी, हिंगणीगाडा, आलेगाव, कोरेगाव भिवर, उंडवडी, राजेगाव, गिरीम, खामगाव, खोरवडी. सर्वसाधारण : खडकी, कुसेगाव, कौठडी, स्वामी चिंचोली, पिंपळगाव, कासुर्डी, खोर, मळद, नानगाव, खानोटा, खुटबाव, लडकतवाडी, पडवी व पेडगाव. ०००