मंदिर वही बेनेगाचा तोगडियांचा नारा
By admin | Published: November 28, 2015 11:52 PM2015-11-28T23:52:47+5:302015-11-28T23:52:47+5:30
जळगाव : श्रीराम मंदिर मोठे बांधू, भव्य बांधू व आयोध्येतील त्याच जागेवर त्याची उभारणी केली जाईल, असे ठाम उद्गार विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे पत्रकारांशी बोलताना काढले.
Next
ज गाव : श्रीराम मंदिर मोठे बांधू, भव्य बांधू व आयोध्येतील त्याच जागेवर त्याची उभारणी केली जाईल, असे ठाम उद्गार विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे पत्रकारांशी बोलताना काढले. जळगाव येथे विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय सेवा विभाग प्रमुखांच्या दोन दिवसीय बैठकीचे कुुसंुबा येथील गोशाळेत आयोजन करण्यात आले. या परिषदेत तोगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, दोन दिवसाच्या या परिषदेत विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या शिक्षण,आरोग्य व स्वावलंबन या तीन सेवा कार्यात कशी वाढ होईल या विषयावर मंथन होणार आहे. आज देशात ५३ हजार गावांमध्ये २० लाखांहून अधिक विद्यार्थी विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्यातून मोफत शिक्षण घेत आहेत. एक लाख विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेत असून ५० हजारांहून अधिक विद्यार्थी वसतीगृहात राहून उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहेत. शिक्षीत हिंदू, समृद्ध हिंदू,रोजगार युक्त, आरोग्य संपन्न हिंदू हे प्राप्त करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंदिर होईलचअयोध्येतील श्रीराम मंदिराच्या विषयावर बोलताना तोगडिया म्हणाले, आयोध्येत भव्य श्रीराम मंदिर होईल आणि होते त्याच जागेवर ते बनेल. देशात चर्चा सुरू असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्यावर विचारता या विषयावर आपणास काहीही बोलायचे नसल्याचे सांगून त्यांनी बोलणे टाळलेे.