हिंदुत्ववादी शक्तींविरोधात एकत्र या - मुस्लीम लॉ बोर्डाचे आवाहन
By Admin | Published: June 23, 2015 02:46 PM2015-06-23T14:46:35+5:302015-06-23T14:50:11+5:30
इस्लाम धर्मविरोधी कारवाया वाढत असून हिंदुत्ववादी शक्तींविरोधात मुस्लिमांनी एकत्र यावे असे जाहीर आवाहन ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डाने केले आहे.
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २३ - इस्लाम धर्मविरोधी कारवाया वाढत असून हिंदुत्ववादी शक्तींविरोधात मुस्लिमांनी एकत्र यावे असे जाहीर आवाहन ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डाने केले आहे. या संदर्भातील पत्रच बोर्डाने देशभरातील मस्जिद, मदरशांमध्ये पाठवले आहे.
मुस्लीम लॉ बोर्डाचा देशभरातील मुस्लिम समाजावर मोठा प्रभाव आहे. बोर्डाचे सचिव मौलाना वाली रहमानी यांनी नुकतेच देशभरातील मशिदी व मदरशांमधील मौलानांना एक पत्र पाठवले आहे. यात हिंदुत्ववादी शक्तींविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. केंद्र सरकारने योग, सुर्य नमस्कार, वंदे मातरम बोलणे या गोष्टी बंधनकारक केल्या असून हे सर्व इस्लाम विरोधी असल्याचे या पत्रात म्हटले आहे. गीतेमधील सहाव्या अध्यायाचा दाखला देत योग ही ब्राह्मण धर्मातील एक धार्मिक प्रक्रिया असल्याचा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. या संपूर्ण पत्रात हिंदू धर्म असा उल्लेख न करता ब्राह्मण धर्म असा उल्लेख करण्यात आला आहे. दलित वर्ग डोळ्यासमोर ठेऊन मुस्लीम लॉ बोर्डाने हा शब्दप्रयोग केला असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. योग सक्तीचा करुन केंद्र सरकार संविधानाचा अपमान करत असून सरकारने धार्मिक बाबींचा प्रचार करणे चुकीचे आहे अशी टीकाही या पत्रात करण्यात आली आहे.