उरी हल्ल्यामागे 'तोयबा'च - एनआयए
By admin | Published: January 19, 2017 07:50 PM2017-01-19T19:50:45+5:302017-01-19T19:53:13+5:30
जम्मू-काश्मीरमधील उरी आणि हांडवारा येथील भारतीय सैन्याच्या तळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - जम्मू-काश्मीरमधील उरी आणि हांडवारा येथील भारतीय सैन्याच्या तळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले आहे.
संशयीत दहशतवादी संघटनेला मिळणा-या निधीबाबत हुर्रियत संघटनेचे अध्यक्ष सय्यद अली शहा गिलानी यांच्या पाच बॅंक खात्यांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आली. यावेळी या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचाच हात असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून देण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये उरीमधील 12 व्या ब्रिगेडमधील 20 जवान शहिद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.