शौचालयांसाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2016 01:54 PM2016-04-01T13:54:56+5:302016-04-01T13:54:56+5:30

हनारखेडी गावात सरपंचानं गावात घरोघरी शौचालयाची सोय करण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याची घटना समोर आली आहे.

For the toilets put wife's jewelry and mortgages | शौचालयांसाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण

शौचालयांसाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण

Next

ऑनलाइन लोकमत
मध्य प्रदेश, दि. 1- मध्य प्रदेशमधल्या रतलाम जिल्ह्यातल्या हनारखेडी गावात सरपंचानं गावात घरोघरी शौचालयाची सोय करण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याची घटना समोर आली आहे.
35 वर्षीय सरपंच दिनेश नयेमा यांना गावात एकाही घरात शौचालय नसल्यानं वाईट वाटत होतं. जेव्हा त्यांनी यासंदर्भात सरकारी अधिका-यांशी बातचीत केली. त्यावेळी फक्त शौचालय बांधल्यावरच सरकारी निधी मिळत असल्याची त्यांना माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी स्वतःच्या पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि जवळपास 2 लाखांचं कर्ज काढून 18 दिवसांत गावात 900 शौचालयं बांधली.
 ही माहिती ज्यावेळी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कानावर पडली..तेव्हा त्यांनी 24 तासांच्या आत शौचालयांच्या बांधकामांची रक्कम वळती केली...

Web Title: For the toilets put wife's jewelry and mortgages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.