नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:39 AM2021-08-10T10:39:13+5:302021-08-10T10:41:35+5:30

Neeraj Chopra Gold Medal News: नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना एका पेट्रोल पंप चालकाकडून देण्यात आली ऑफर. नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मालकानं घेतला निर्णय.

tokyo olypmic 2020 petrol pump owner giving petrol of rs 501whose name is neeraj in gujarat | नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर'

नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर'

googlenewsNext
ठळक मुद्देनीरज नावाच्या सर्व व्यक्तींना एका पेट्रोल पंप चालकाकडून देण्यात आली ऑफर.नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मालकानं घेतला निर्णय.

Neeraj Chopra Gold Medal in Tokyo Olymic: यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. यावर्षी भारतानं सात पदकं आपल्या नावे केली. यामध्ये एक सुवर्ण पदक, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वच खेळाडूंची कामगिरी ऑलिम्पिकदरम्यान उत्तम होती. दरम्यान, नीरज चोप्रानं अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. 

नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर अनेकांनी त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावर केला. परंतु गुजरातमधील भरूच येथील एका पेट्रोल पंप चालकानं मात्र लोकांना अनोखी भेट दिली. त्यांनी आपला आनंद अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला. भरूचमध्ये असलेल्या पेट्रोल पंपाचे चालक अयूब पठाण हे नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना ५०१ रूपयांचं पेट्रोल मोफत (Free Petrol) देत आहेत.


गुजरातमधील भरूच येथे सध्या पेट्रोलची किंमत ९८ रूपये प्रति लिटर इतकी आहे. किंमत जास्त असली तरी पठाण यांनी अनोख्या पद्धतीनं आपला आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या नीरज नावाच्या व्यक्तीला आयडी कार्ड दाखवल्यानंतर ते ५०१ रूपयांचं पेट्रोल अगदी मोफत देत आहेत. त्यांनी आतापर्यंत ३० जणांना मोफत पेट्रोल देत आहेत. ही स्कीम पुढील २ दिवस अशीच सुरू राहणार आहे. भारताच्या इतिहासात वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 

Web Title: tokyo olypmic 2020 petrol pump owner giving petrol of rs 501whose name is neeraj in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.