गुजरातमध्ये 15 ऑगस्टपासून टोलमुक्ती, महाराष्ट्रात कधी ?
By admin | Published: July 30, 2016 03:06 PM2016-07-30T15:06:25+5:302016-07-30T16:08:45+5:30
गुजरातमध्ये 15 ऑगस्टपासून टोलमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. कार आणि छोट्या वाहनांना ही करमुक्ती लागू करण्यात येणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
अहमदाबाद, दि. 30 - गुजरातमध्ये 15 ऑगस्टपासून टोलमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. कार आणि छोट्या वाहनांना ही करमुक्ती लागू करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होतं आहे. गुजरातमध्ये टोलमुक्ती जाहीर झाल्याने आता महाराष्ट्रात टोलमुक्ती होणार की नाही ? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
भाजपाने महाराष्ट्रात निवडणुकीआधी टोलमुक्तीची आश्वासनं देऊनही अजूनपर्यंत टोलमुक्ती न झाल्याने विरोधकांसह जनतेच्या टिकेला राज्य सरकारला सामोरे जावं लागत आहे. सत्तेत आल्यानंतर काही दिवसातच नितीन गडकरी यांनी सरसकट टोलमुक्ती शक्य नसल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे सरकारने दिलेलं आश्वासन खोटं होतं का ? असा सवाल जनतेकडून विचारला जात होता.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील 12 टोलनाके कायमचे बंद आणि 53 टोलनाक्यांवरुन छोट्या वाहनांना सूट दिली. मात्र सरसकट टोलमुक्ती करण्यात आलेली नाही.