केंद्रापाठोपाठ राज्यातही 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी
By admin | Published: November 11, 2016 06:36 PM2016-11-11T18:36:12+5:302016-11-11T19:50:42+5:30
देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल 14 नोव्हेंबरपर्यंत माफ
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल14 नोव्हेंबरपर्यंत माफ करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर आज याबाबत घोषणा केली. 500-1000 रूपयांच्या बंदीमुळे नागरिकांची सुट्टे पैसे देताना चांगलीच तारांबळ उडत आहे त्यापार्श्वभुमीवर टोलमाफी वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहतूक सुरळीत राहील ,असे गडकरी यांनी ट्विटरवरून जाहीर केले.
14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही टोलमाफी असणार आहे. यापुर्वी 11 नोव्हेंबपर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत आज मध्यरात्री संपणार होती.
Government Of Maharashtra extends the date to keep all State roads toll tax free(including Mumbai) till 14th November midnight.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) 11 November 2016
To ensure smooth traffic movement across all National Highways, the toll suspension has been extended till 14th November midnight
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) 11 November 2016