तोमर यांचा अर्ज विद्यापीठातून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2015 12:11 AM2015-06-25T00:11:13+5:302015-06-25T00:11:13+5:30

बनावट पदवीप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना तिलका मांझी भागलपूर विद्यापीठात वाटप करण्यात आलेला

Tomar's application disappeared from the university | तोमर यांचा अर्ज विद्यापीठातून गायब

तोमर यांचा अर्ज विद्यापीठातून गायब

Next

भागलपूर : बनावट पदवीप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना तिलका मांझी भागलपूर विद्यापीठात वाटप करण्यात आलेला रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला अर्ज गायब असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
दिल्लीचे सहायक पोलीस आयुक्त प्रमोदसिंग कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय पोलीस पथकाने मंगळवारी भागलपूर येथील या विद्यापीठात चौकशी केली. त्यावेळी तोमर यांचा हा महत्त्वाचा अर्ज विद्यापीठाच्या परीक्षा विभागातूनच गायब असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत विद्यापीठाच्या सहा कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. आम आदमी पार्टीचे आमदार तोमर यांना ९ जून रोजी अटक करण्यात आली होती. विरोधकांच्या प्रचंड दबावानंतर तोमर यांनी कायदामंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Tomar's application disappeared from the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.