तोमर यांची गच्छंती ?

By admin | Published: June 13, 2015 12:01 AM2015-06-13T00:01:14+5:302015-06-13T00:01:14+5:30

बनावट पदवीप्रकरणी अटक झालेले माजी कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांनी पक्षनेतृत्वाची दिशाभूल केल्याबद्दल त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी

Tomar's clutter? | तोमर यांची गच्छंती ?

तोमर यांची गच्छंती ?

Next

नवी दिल्ली : बनावट पदवीप्रकरणी अटक झालेले माजी कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांनी पक्षनेतृत्वाची दिशाभूल केल्याबद्दल त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्याचे संकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. वकील एच. एस. फुलका हे तोमर यांची बाजू मांडत असून सरकारकडून दिली जाणारी ही कायदेशीर मदतही काढून घेण्याचा त्यांचा विचार आहे. दरम्यान ‘आप’चे आणखी एक आमदार विशेष रवी यांचा शैक्षणिक पात्रतेचा वाद उफाळून आल्यामुळे पक्षात सध्या जे सुरूआहे त्यामुळे केजरीवाल उद्विग्न झाल्याचे दिसते. दरम्यान, आपने केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तोमर यांनी बनावट पदवीच्या आधारे कायदामंत्री पद मिळवून नेतृत्वाची दिशाभूल केल्याची भावना पक्षात व्यक्त होत आहे. अशांना पक्षात खपवून घेतले जात नसल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
आपच्या अंतर्गत लोकपालकडे हा मुद्दा सोपविण्यात आला असून अहवाल सादर होताच कारवाईचे पाऊल उचलले जाईल. माजी आयपीएस अधिकारी एन. दिलीपकुमार, माजी पोलीस महासंचालक राकेश सिन्हा, शिक्षण तज्ज्ञ एस.पी. वर्मा यांचा लोकपालमध्ये समावेश आहे.
तोमर खोटे बोलले
तोमर यांना बाजू मांडण्याची योग्य संधी देण्यात आली होती. त्यांना स्वच्छ होऊन बाहेर पडण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी राजकीय कटाचा आरोप केला. त्यांच्या पदवीबाबत मिळालेली माहिती पाहता बनावट बाब समोर आली आहे. त्यांनी काही दस्तऐवज सादर करीत सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र तुम्ही कायम खोटे बोलू शकत नाहीत, असे आपच्या एका नेत्याने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Tomar's clutter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.