याला म्हणतात नशीब! टोमॅटोने केलं मालामाल; शेतकरी झाला करोडपती, कमावले 2 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:03 AM2023-07-26T11:03:05+5:302023-07-26T11:09:12+5:30

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीने एका शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे.

tomato made millionaire telangana farmer mahipal reddy earned 2 crore | याला म्हणतात नशीब! टोमॅटोने केलं मालामाल; शेतकरी झाला करोडपती, कमावले 2 कोटी

याला म्हणतात नशीब! टोमॅटोने केलं मालामाल; शेतकरी झाला करोडपती, कमावले 2 कोटी

googlenewsNext

देशात टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये त्याची किंमत 200 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे महागाईने जनता हैराण झालेली असताना दुसरीकडे टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीने तेलंगणातील एका शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे. तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील महिपाल रेड्डी यांनी गेल्या 40 दिवसांत सुमारे 2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

महिपाल रेड्डी यांनी 8 एकरात टोमॅटोची लागवड केली होती. एनडीटीव्हीशी संवाद साधताना रेड्डी म्हणाले की, गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले नाही. पण त्यांनी हिंमत केली. ते एप्रिलच्या उत्तरार्धात पीक पेरतात, उष्णतेपासून वाचण्यासाठी जाळी वापरतात आणि हंगामी कमतरता असताना जूनच्या मध्यात कापणी सुरू करतात. 

महिपाल यांचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी गौरव केला आहे. महिपाल आणि त्यांच्या पत्नीला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केल्याने आनंद झाला, त्यांनी सांगितले की आदर्श शेतकऱ्याचा राज्याला अभिमान वाटला आहे आणि इतरांसाठी प्रेरणा आहे. सध्या या शेतकऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

विशेष म्हणजे, जून-जुलैमध्ये टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे आंध्र प्रदेशातील मदनपल्ले आणि कर्नाटकातील कोलार येथील पिकावरील व्हायरसचा हल्ला, जे सुमारे 10 राज्यांना टोमॅटोचा पुरवठा करत होते. पावसामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. शेतकरी महिपाल रेड्डी सांगतात की, पावसाचा फटका बसला नाही तर टोमॅटोच्या विक्रीतून एक कोटी रुपयांचा नफा मिळवू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: tomato made millionaire telangana farmer mahipal reddy earned 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.