बदायूं पीडितांची थडगी पाण्याखाली
By admin | Published: July 20, 2014 01:53 AM2014-07-20T01:53:03+5:302014-07-20T01:53:03+5:30
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित बदायूं बलात्कार - हत्या प्रकरणातील दोन पीडित मुलींचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करण्याच्या प्रयत्नांवर आज शनिवारी पाणी फेरले गेल़े
Next
बदायूं : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित बदायूं बलात्कार - हत्या प्रकरणातील दोन पीडित मुलींचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करण्याच्या प्रयत्नांवर आज शनिवारी पाणी फेरले गेल़े शवविच्छेदन प्रक्रिया आज सुरू केली गेली़ पण गंगेचे पात्र फुगल्यामुळे या पीडित मुलींची थडगी पाण्यात बुडाली आणि सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेल़े
उत्तर प्रदेशच्या बदायूं बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास करणा:या सीबीआयने याप्रकरणी एक वैद्यकीय समिती (मेडिकल बोर्ड) गठित केली आह़े ही समिती उद्या रविवारी दोन्ही पीडितांचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करणार होती़ मात्र गंगेचा जलस्तर वाढल्यास संबंधित पीडितांना पुरले ती जागा पाण्याखाली जाण्याची शक्यता बघता, वैद्यकीय समितीने आजच मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेतला़ पण गंगेच्या प्रवाहाची गती बघता, ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही़
पोलीस अधीक्षक (शहर) मानसिंह चौहान सांगितले की, मुसळधार पाऊस तसेच हरिद्वारच्या धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे गंगेचा जलस्तर अचानक वाढला़ यामुळे अटैना घाटावर पीडित मुलींची थडगी सुमारे तीन फूट पाण्यात बुडाली़ याउपरही ती खोदून पुरलेले मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले गेल़े मात्र पाण्याच्या प्रवाहाची गती बघता अखेर हे प्रयत्न थांबवावे लागल़े उद्या ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल वा नाही, याबाबत सीबीआय निर्णय घेईल़
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, फोरेन्सिक तज्ज्ञांनी याप्रकरणी कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नव्याने शवविच्छेदन करण्याची गरज असल्याची शिफारस केली आह़े त्यामुळेच पुरलेले मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला़ गत 27 मे रोजी 14 आणि 15 वर्षाच्या दोन्ही अल्पवयीन पीडिता घरांतून बेपत्ता झाल्या होत्या़ दुस:याच दिवशी त्यांचे मृतदेह गावातील एका झाडाला गळफास लावलेले आढळले होत़े
स्मृती इराणींची टीका
अमेठी/ लखनौ : उत्तर प्रदेशात महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ बघता, राज्यातील कायदा व व्यवस्था ठीक नसल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आह़े (वृत्तसंस्था)
गत लोकसभा निवडणुकीत इराणी यांनी अमेठीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कडवी झुंज दिली होती़ यानंतर आज शनिवारी त्या प्रथमच अमेठीत आल्या़ उत्तर प्रदेशातील कायदा व व्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे, हा सपा प्रमुख मुलायमसिंग यादव यांचा दावा स्मृती इराणींनी यावेळी खोडून काढला़ मुलायमसिंग ज्येष्ठ नेते आहेत़ त्यांनी कुठलेही वक्तव्य विचारपूर्वक करायला हव़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
4लखनौ : लखनौच्या मोहनलालगंजमध्ये एका महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी राज्यपाल अजीज कुरैशी यांची भेट घेतली.
4राज्यपालांनी शुक्रवारी या प्रकरणीचा अहवाल मागितला होता. ही भेट सुमारे 4क् मिनिटे चालली़ या भेटीबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी मोहनलालगंज प्रकरणावर यावेळी चर्चा झाल्याचे समजत़े