नांदूरशिंगोटे येथे उद्यापासून र
By admin | Published: December 29, 2016 08:55 PM2016-12-29T20:55:54+5:302016-12-29T23:57:12+5:30
ेणुकामाता यात्रोत्सव जय्यत तयारी : तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास येत्या शुक्रवार (दि ३०) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे गाव परिसरातील सुमारे ३० गावांचे मध्यवर्ती केंद्र आहे. गावाचे आराध्यदैवत असणारी श्री रेणुकामाता परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पौष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी यात्रेस प्रारंभ होणार आहे. यात्रासमिती व ग्रामपंचायत प्रशासन यांची बैठक होऊन मंदिर परिसर व गावभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात्रा उत्सव समितीच्या वतीने मंदिर परिसरात सुशोभिकरण, सजावट आणि मंदिर संकुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर संकुलात रेणुकामाता, विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त महाराज, साईनाथ महाराज, श्रीराम, खंडेराव महाराज अशी सहा मंदिरे आहेत. संपूर्ण मंदिराच्या गाभार्यात व बाहेरील बाजूस तीन वर्षापूर्वी मार्बल व ग्रेनाईट बसविण्यात आल्याने भव्य दिव्य वास्तू साकारली आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता मंदिराच्या पटांगणात कनात उभारली जाते. सकाळी ९ वाजता देवीला मंगलस्नान व अभिषेक घातला जातो. त्यानंतर हिरवे पातळ, हिरव्या बांगड्यांचा चुडा व नथ चढविली जाणार आहे. यावेळी रेणुका मातेची विधीवत पूजा करुन महाआरती होते. सायंकाळी गावातून कावड व देवीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणूकीत गावातील आबालवृध्दांसह तरुण मित्र मंडळ व महिला वर्ग सहभागी होतात.
मिरवणुकीच्या शेवटी पुन्हा महाआरती करुन देवीचा मुखवटा भाविकांना दर्शनासाठी मंदिरात ठेवला जातो. देवीला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. यानंतर बाजारतळावर रात्री फटाक्यांची आतषबाजी व शोभेची दारु उडविली जाणार आहे. रात्री करमणुकीसाठी वसंत नांदवळकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
यात्रेच्या दुसर्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. ३१) मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गावातील व पंचक्रोशीतील महिला नवस फेडण्यासाठी लोटांगण, गळ खेळणे, प्रसाद वाटप करतात. दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून यावेळी सुमारे तीन हजार रुपयांपर्यंत इनाम दिले जाणार आहे. याप्रसंगी नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. यात्रेच्या पूर्व संध्येला मिठाईवाले, खेळणीवाले, कटलरीवाले आदि दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे.