उद्या सांगाल लोकांच्या बोटात गडबड, मिश्रांचा केजरीवालांवर पलटवार

By admin | Published: May 9, 2017 06:56 PM2017-05-09T18:56:39+5:302017-05-09T18:56:39+5:30

आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभेत उचललेल्या ईव्हीएम मशिनमधल्या छेडछाडीच्या मुद्द्याचा कपिल मिश्रांनी खरपूस समाचार घेतला

Tomorrow, people's fingers get disturbed, Mishra turns back on Kejriwal | उद्या सांगाल लोकांच्या बोटात गडबड, मिश्रांचा केजरीवालांवर पलटवार

उद्या सांगाल लोकांच्या बोटात गडबड, मिश्रांचा केजरीवालांवर पलटवार

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभेत उचललेल्या ईव्हीएम मशिनमधल्या छेडछाडीच्या मुद्द्याचा कपिल मिश्रांनी खरपूस समाचार घेतला आहे. उद्या अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष लोकांच्या बोटांमध्येही गडबड असल्याचंही सांगेल, असं म्हणत मिश्रांनी केजरीवालांसह आपवर टीकास्त्र सोडलं आहे. निवडणुकीत विजय न मिळाल्यानं लोकशाहीवर टीका करणं चुकीचं आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीच आपकडून ईव्हीएमचा मुद्दा पुढे केला गेला आहे, असा आरोपही मिश्रा यांनी केला आहे. आपच्या सौरभ भारद्वाज यांनी एका प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशिनशी छेडछाड करणं शक्य असल्याचं दाखवलं होतं. त्यावर कपिल मिश्रा म्हणाले, या देशातील निवडणूक प्रक्रिया जगभरात पाहिली जाते. आमच्या देशात निवडणुकीला एक इभ्रत आहे. आम आदमी पार्टी एकही निवडणूक जिंकू शकत नाही. आता केजरीवालांच्या नावावर एकही मत मिळत नाही. आम आदमी पार्टीनं एश्टच्या माध्यमातूनच निवडणुका जिंकल्या आहेत. केजरीवाल आम आदमी पार्टीची इभ्रत वाचवण्यासाठीच असे प्रकार करत असल्याचंही मिश्रा म्हणाले आहेत.
(भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देत आपनं उठवला ईव्हीएमचा मुद्दा)
आपच्या अलका लांबा यांनी ईव्हीएमवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या राज्यात फ्रीजमध्ये बीफ ठेवल्यानं एकाची हत्या केली जाते, तिथे ईव्हीएमवर संशय का घेतला जाऊ शकत नाही. आपच्या नेत्यांनी ईव्हीएम टॅम्परिंगसंदर्भात तीनदा माहिती मागवली होती. मात्र निवडणूक आयोगानं त्यांना काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. दिल्लीच्या महापालिका निवडणुकीत जनरेशन थ्री मशिन असतानाही जनरेशन वनच्या मशिनी वापरण्यात आल्या आहेत. अल्का म्हणाल्या, निवडणूक आयोगाकडे पर्याप्त ईव्हीएम मशिन असतानाही राजस्थानमधून ईव्हीएम मशिन मागवाव्या लागल्या आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे खराब करून या ईव्हीएम मशिनशी छेडछाड केल्यानंतर भाजपाच्या उमेदवारांना जिंकवण्यात आलं आहे. त्यानंतर आपच्या सौरभ भारद्वाज यांनी एका प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशिनशी छेडछाड करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याच वेळी भाजपाच्या सदस्यांनी केजरीवालांच्या कथित 1 हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला असता, त्यावर अध्यक्षांनी चर्चा करण्यास नकार दिला.

 

भाजपाचे विजेंदर गुप्ता दस्तऐवज घेऊन विधानसभेत पोहोचले असता, अध्यक्षांनी पुरावे विधानभवनाच्या पटलावर ठेवण्यास मंजुरी दिली नाही. तसेच भाजपचा स्थगन प्रस्ताव रद्द केला. त्यामुळे गुप्ता विधानसभेच्या बाहेरच उपोषणाला बसले होते. तत्पूर्वी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Tomorrow, people's fingers get disturbed, Mishra turns back on Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.