दहा लाखाचा गुटखा पकडला
By admin | Published: April 26, 2016 11:15 PM2016-04-26T23:15:50+5:302016-04-26T23:15:50+5:30
जळगाव: अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सिंधी कॉलनी व कंवरनगर भागात धाड टाकून रवीकुमार वासुदेव राजपाल यांच्या राहत्या घरातून विविध सहा प्रकारचा दहा लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. साजन चंदुमल कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही चार हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला, मात्र कारवाईच्या धाकाने तो फरार झाला.दोन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
Next
ज गाव: अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सिंधी कॉलनी व कंवरनगर भागात धाड टाकून रवीकुमार वासुदेव राजपाल यांच्या राहत्या घरातून विविध सहा प्रकारचा दहा लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. साजन चंदुमल कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही चार हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला, मात्र कारवाईच्या धाकाने तो फरार झाला.दोन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.कंवर नगरात एका घरात गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलींद शहा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी डी.के.सोनवणे, संदीप देवरे कर्मचार चंदू सोनवणे, बंडू बारी,चौधरी, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक उपनिरीक्षक रतन आठवले व महिला कर्मचारी प्रविणा चौधरी आदींनी राजपाल यांच्या राहत्या घरी धाड टाकली. त्यात सहा प्रकारचा दहा ते बारा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला. तीन मालवाहू टेम्पोद्वारे हा गुटखा आंबेडकर मार्केटमधील कार्यालयात आणण्यात आला.कारवाईच्या भीतीने घर केले बंदघरात गुटख्याचा साठा असल्याने कारवाई होण्याच्या भीतीने राजपाल याने तीन तास घराचा दरवाजाच उघडला नाही, त्यामुळे पथकाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी दम दिल्यानंतर त्याने दरवाजा उघडला. साजन कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही चार हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुटख्याचा पंचनामा सुरुच होता.