उड्डाण केलं आणि काही मिनिटांतच गायब, जमशेदपूरहून उडालेल्या विमानाचा शोध लागेना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:16 AM2024-08-22T11:16:59+5:302024-08-22T11:18:03+5:30

Jamshedpur Plane Crash: उड्डाण केल्यानंतर काही काळानंतर बेपत्ता झालेल्या मलेशियाच्या एमएच३७० विमानाचं गुढ १० वर्षांनंतरही उकललेलं नाही. दरम्यान, अशीच घटना झारखंडमध्ये घडली आहे. जमशेदपूरहून उड्डाण केल्यानंतर संपर्क तुटलेल्या ट्रेनी विमानाचा शोध लागत नाही आहे.

took off and disappeared within minutes, the plane that took off from Jamshedpur was never traced | उड्डाण केलं आणि काही मिनिटांतच गायब, जमशेदपूरहून उडालेल्या विमानाचा शोध लागेना

उड्डाण केलं आणि काही मिनिटांतच गायब, जमशेदपूरहून उडालेल्या विमानाचा शोध लागेना

उड्डाण केल्यानंतर काही काळानंतर बेपत्ता झालेल्या मलेशियाच्या एमएच३७० विमानाचं गुढ १० वर्षांनंतरही उकललेलं नाही. दरम्यान, अशीच घटना झारखंडमध्ये घडली आहे. जमशेदपूरहून उड्डाण केल्यानंतर संपर्क तुटलेल्या ट्रेनी विमानाचा शोध लागत नाही आहे. या विमानाने जमशेदपूरमधील सोनारी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते बेपत्ता झाले होते. या विमानाचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. एनडीआरएफकडून सारायकेला येथील चांडिल डॅममध्ये एनडीआरएफच्या टीमकडून विमानाचा शोध घेतला आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा शोध घेतला जात आहे. मात्र विमानाबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. 

एका स्थानिक तरुणाने दिलेल्या माहितीनुसार त्याने एका छोट्या विमानाला चांडिल डॅममध्ये कोसळताना पाहिले होते. दरम्यान, या विमानामध्ये असलेले कॅप्टन जीत शत्रू आणि ट्रेनी कॅप्टन सुब्रतो दीप यांच्याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. एनडीआरएफचं पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक पातळीवरच चांडिल डॅममध्ये शोधमोहीम राबवण्यात येत होती. बुधवारी दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र यादरम्यान, विमान आणि विमातील वैमानिकांबाबत काहीच माहिती मिळाली नाही.  

अल्केमिस्ट एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या या विमानाने मंगळवारी सकाळी ११ वाजता सोनारी विमानतळावरून उड्डाण केलं होतं. त्यानंतर ५० मिनिटांनंतर या विमानाचा एटीसी असलेला संपर्क तुटून ते बेपत्ता झाले होते. मंगळवारी दिवसभर एव्हिएशनच्या टीमसह जमशेदपूर आणि सारायकेला येथील प्रशासन आणि वनविभागच्या कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत होता.

सध्या जमशेदपूर आणि सरायकेला प्रशासनाकडून बेपत्ता विमानाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान, अने प्रकारच्या अफवांमुळेही प्रशासनासमोर समस्या निर्माण होत आहेत. सध्या जिल्हा प्रशासनाची टीम चांडिल डॅम येथे तळ ठोकून आहे. तसेच आज सकाळपासून चांडिल डॅममध्ये विमानाचा शोध घेतला जात आहे.  

Web Title: took off and disappeared within minutes, the plane that took off from Jamshedpur was never traced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.