एक लाख लोकांना बाहेर काढले
By admin | Published: September 12, 2014 02:33 AM2014-09-12T02:33:52+5:302014-09-12T02:33:52+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये महापुरात अडकलेल्या एक लाख लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे आणि आता पुरात सापडलेल्या आणखी लक्षावधी लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये महापुरात अडकलेल्या एक लाख लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे आणि आता पुरात सापडलेल्या आणखी लक्षावधी लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. राज्यात पुराचे पाणी ओसरत असले तरी पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मदतपथकांनी ८०७ नागरिकांना बाहेर काढण्यात यश मिळविले. १०९ वर्षांनंतर राज्यात अशी नैसर्गिक आपत्ती ओढवली. यात आतापर्यंत २५० च्यावर नागरिकांचा बळी गेला आहे तर लाखो बेघर झाले आहेत. विविध संघटनांकडून राबविल्या जात असलेल्या या मदत अभियानात नागरिकांना आतापर्यंत ८०७ टन अन्न, पाणी, औषधे व अन्य मदत सामग्री पोहचविण्यात आली आहे.