टूथ पेस्ट, मुल्तानी माती अन् PPE किट, अश्रुधुराचा सामना करण्यासाठी असे देशी जुगाड करतायत शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 06:58 PM2024-02-15T18:58:01+5:302024-02-15T18:58:58+5:30

कुणी अश्रुधुरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टूथपेस्टचा लेप लावताना दिसत आहेत. कुणी मुलतानी मातीचा वापर करताना दिसत आहे, तर कुणी पतंगाच्या सहाय्याने, सुरक्षा दलांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ड्रोनचा सामना करताना दिसत आहेत.

Tooth paste, multani mati and PPE kits, farmers doing such desi juga to fight tear gas | टूथ पेस्ट, मुल्तानी माती अन् PPE किट, अश्रुधुराचा सामना करण्यासाठी असे देशी जुगाड करतायत शेतकरी

टूथ पेस्ट, मुल्तानी माती अन् PPE किट, अश्रुधुराचा सामना करण्यासाठी असे देशी जुगाड करतायत शेतकरी

पंजाब आणि हरियाना दरम्यानच्या शंभू सीमेवर हरियाणा पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना रोखले आहे. यासाठी अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. शेतकरी आंदोलक सीमा ओलांडू शकले नाही. मात्र, हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दलाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा सामना करण्यासाठी या शेतकऱ्यांनी अफलातून देशी जुगाड शोधून काढले आहेत. कुणी अश्रुधुरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टूथपेस्टचा लेप लावताना दिसत आहेत. कुणी मुलतानी मातीचा वापर करताना दिसत आहे, तर कुणी पतंगाच्या सहाय्याने, सुरक्षा दलांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ड्रोनचा सामना करताना दिसत आहेत.

आंदोलकांचे 'देशी जुगाड' -
शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी ड्रोनच्या माध्यमाने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र, शेतकरी त्यांचा सामना करण्यासाठी पाण्याने भिजलेले पोते त्याव टाकून त्यांना निष्क्रिय करत आहेत. गॅसचा प्रभाव कमी करण्यासाठी शेतकरी स्प्रे पंपांचाही वापर करत आहेत. तसेच रबरी बुलेट्सपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी फुल बॉडी प्रोटेक्टर परिधान केले आहेत. एवढेच नाही, तर रसायन युक्त पाण्याच्या फवाऱ्यांसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी पीपीई किटचाही वापर करत आहेत.

मुल्तानी मातीचा वापर -
याशिवाय, अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी अनेक जण चेहऱ्यावर मुल्तानी मातीचा लेपही लावत आहेत. तसेच टुथ पेस्टचा वापरही केला जात आहे. तसेच पाण्याच्या फवाऱ्यापासून बचाव करण्यासाठी ट्रॅक्टर्सना माॅडीफाय करण्यात आले आहे. त्यांना विशिष्ट प्रकारची शील्ड लवण्यात आले आहेत. अश्रुधुराचा सामना करण्यासाठी बाॅर्डरवर मोठे पंखेही लावण्यात आले आहेत. यांच्या सहाय्याने धुरापासून बचाव केला जाऊ शकतो.

महत्वाचे म्हणजे, स्प्रे पंपने पाण्याचा वर्षावर करण्यासाठी टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय किसान यूनियन क्रांतिकारीचे प्रमुख रणजीत सिंह सवाजपूर यांनी म्हटले आहे की, मंगळवारी शेतकऱ्यांकडे जवळपास 50 टँकरची व्यवस्था होती. आता आणकी 30 टँकरची व्यवस्था कण्यात येत आहे.

Web Title: Tooth paste, multani mati and PPE kits, farmers doing such desi juga to fight tear gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.