Jammu and Kashmir: शोपियांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 10:54 AM2021-07-19T10:54:06+5:302021-07-19T10:54:48+5:30

Terrorist Killed in Shopian: 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये लष्करचा म्होरक्या एजाझ ऊर्फ अबू हुरैरासह तीन दहशतवादी ठार झाले होते.

Top Lashkar e Taiba commander killed in encounter in Jammu kashmir Shopian | Jammu and Kashmir: शोपियांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्थान

Jammu and Kashmir: शोपियांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्थान

Next
ठळक मुद्देसैन्याने मागील काही दिवसांत लष्कर, हिज्बुल मुजाहिदीन आणि इतर संघटनांच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे.

शोपियां: जम्मू-काश्मीरमधील(Jammu-Kashmir) शोपियां(Shopian)मध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत लष्कर-ए-तोयबा(Lashkar e Toiba) च्या टॉप कमांडरसह दोघांचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये शोपिंया जिल्ह्यात रात्री झालेल्या चकमकीत या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. मृतांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा स्वयंभू कमांडर इश्फाक डार उर्फ अबु अकरम याचाही समावेश होता.

काश्मीर पोलीस प्रमुख (आयजीपी) विजय कुमार म्हणाले की, इश्फाक डार उर्फ अबू अकरम 2017 मध्ये या प्रदेशातील सर्वाधिक सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक होता. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या माध्यमातून चालवण्यात आलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये त्याला मारण्यात आलं आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्या दोघांकडून  AK-47 आणि आठ मॅगझीन जप्त केली आहेत.

यापूर्वी तिघांचा खात्मा
दरम्यान, यापूर्वी 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये पाकिस्तानच्या लष्करे तोयबा या संघटनेचा म्होरक्या एजाझ ऊर्फ अबू हुरैरा याच्यासह तीन दहशतवादी चकमकीत ठार झाले होते. जम्मू- काश्‍मीरमधील पुलवामा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. हुरैरा हा श्रीनगर व पुलवामात सक्रिय होता. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला होता. मागीच्या काही दिवसांपासून भारतीय सैन्याला मोठं यश मिळत आहे. सैन्याने मागील काही दिवसांत लष्कर, हिज्बुल मुजाहिदीन आणि इतर संघटनांच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे.

Web Title: Top Lashkar e Taiba commander killed in encounter in Jammu kashmir Shopian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.