Google Top Trends of 2021: 'हे' दहा व्यक्ती जे २०२१ मध्ये गुगलवर ट्रेंडिंग ला राहिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 02:14 PM2021-12-17T14:14:12+5:302021-12-17T14:35:46+5:30

गूगने नुकतंच २०२१च्या टॉप ट्रेंड्सची ( Google Top Trends of 2021 ) ची लिस्ट जाहीर केली आहे...

top ten people who are trending on google in 2021 year | Google Top Trends of 2021: 'हे' दहा व्यक्ती जे २०२१ मध्ये गुगलवर ट्रेंडिंग ला राहिले...

Google Top Trends of 2021: 'हे' दहा व्यक्ती जे २०२१ मध्ये गुगलवर ट्रेंडिंग ला राहिले...

Next

पुणे: दररोज अशा काही व्यक्ती चर्चेत येतात ज्यांच्याबद्दल आपल्याला फार काही माहिती नसते. मग आपण पाहिलं काम करतो आपला फोन हातात घेतो आणि त्या व्यक्तीला थेट गुगल वर सर्च करतो. आणि त्या बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. गूगने नुकतंच २०२१च्या टॉप ट्रेंड्सची ( Google Top Trends of 2021 ) ची लिस्ट जाहीर केली आहे. ज्यात गुगलवर २०२१मध्ये सर्वात जास्त वेळा सर्च केलेल्या व्यक्तींची  यादी आहे. गूगलला सर्वाधिक वेळा बघितलेले  व्यक्ती आपण पाहूयात कदाचित यातले काही तुम्ही आम्ही देखील गूगलवर सर्च केले असतील. कोण आहेत त्या १० ट्रेंडिंग व्यक्ती बघुयात ... 

१) नीरज चोप्रा 

भारताचा भालाफेक स्पर्धेतला स्टार खेळाडू नीरज चोप्राने टोकियो आॉलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू नीरज चोप्रा आहे.भारताच्या नीरज चोप्राने  सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता . भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे. 

 २) आर्यन खान 

आर्यन खान प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान चा मुलगा आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया आलिशान क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा अशा २० जणांना अटक करण्यात आली. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्यावतीने सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी अटीशर्तींसह जामीन मंजूर केला.या सगळ्या गोष्टींमुळे आर्यन खान चर्चेत राहिला होता.

  ३) शहनाझ गिल 

शहनाझ गिल  आता घराघरात प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखली जाते. पंजाबी अभिनेत्री आणि गायिकाअसलेल्या शहनाझ गिलला बिग बॉस १३मधून खूप प्रसिद्धी मिळाली होती. शहनाझ गिलने बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर स्वतःला जबरदस्त पद्धतीने ट्रान्सफॉर्म केले आहे. पंजाबची कॅटरीना कैफ म्हणजेच शहनाझ गिल आता फिट टू फॅट झाली आहे. कोरोना व्हायरसचे संकट आणि लॉकडाऊनदरम्यान शहनाझ गिलने आपले वजन बरेच कमी केले आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या नव्या फोटोजसह ती सतत चर्चेत असते. 

४) राज कुंद्रा

राज कुंद्रा हे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आहेत तसेच ते उद्योजक देखील आहे. राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून काही मोबाइल अॅपवर या फिल्म प्रदर्शित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली होती . याआधी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातही राज कुंद्रा हे अडकले होते. त्या प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाला कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.

५) एलॉन मस्क

एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असून, त्यांना आपल्या नवनवीन आयडियांसाठी ओळखले जाते.एलॉन मस्क हा एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहे. हा टेसला मोटर्स ह्या अमेरिकन कंपनीचा संस्थापक व मुख्याधिकारी आहे. २०२१ या वर्षाचा विचार करता या वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. एलन मस्क हे टेस्लाच्या सीईओ पदासोबतच रॉकेट उत्पादक कंपनी असलेल्या स्पेस एक्सचे देखील सीईओ आणि भागधारक आहेत.

६) विकी कौशल

विकी कौशलने  मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे.त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला आहे. 

७) पी. व्ही. सिंधू 

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूने (पुसर्ला वेंकट सिंधू) ने  1 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून एक नवीन इतिहास रचला. ऑलम्पिक मध्ये सतत दोन पदकं जिंकणारी भारताची ती पहिली महिला ठरली, तर सुशीलकुमार नंतर ही कामगिरी करणारी ती दुसरी एथलिट ठरली. सिंधूने या अगोदर 2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये 'रौप्यपदक' जिंकले होते. . सिंधूने जिंकलेला कांस्यपदक ऑलम्पिकमधील बॅडमिंटन मधील तिसरा पदक आहे.

८) बजरंग पुनिया

खुदान गावचा बजरंग गेली सात-आठ वर्षे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आखाडे गाजवून भारतीय कुस्तीतील 'स्टार' ठरला आहे. २०२१ मध्ये झालेल्या टोकियो अॅथलेटिक्समध्ये ६५ किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळवून मल्ल बजरंग पुनियाने भारताच्या ऑलिम्पिक यशात मोलाची भर घातली आहे. गेल्या वर्षीच तो कुस्तीपटू संगीता फोगटशी विवाहबद्ध झाला. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि 'फिक्की इंडिया'चा पुरस्कार आदी सन्मान त्याला लाभले आहेत.

 ९) सुशील कुमार 

सुशील कुमार हा एक भारतीय कुस्तीपटू आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिक खेळात त्याने ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकणारा तसेच सलग दोन ऑलिंपिक खेळात वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. २०१० मध्ये मॉस्कोत झालेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक  पटकावले आहे. 

१०) नताशा दलाल

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा नताशा दलाल हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे. दोघं एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत होते. नताशा दलाल ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. २०१३मध्ये तिनं फॅशन इन्सस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्कमधून पदवी मिळवली आहे. त्यानंतर ती भारतात आणि डिझायनर म्हणून काम सुरू केलं. जे १० व्यक्ती यावर्षी ट्रेंडिंग मध्ये राहिले त्यात ती १० व्या क्रमांकावर आहे.

Web Title: top ten people who are trending on google in 2021 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.