"सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलण्यापुरतेच", 6500 कार्यकर्त्यांसह मोठ्या नेत्याने भाजपला ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:10 AM2022-08-24T08:10:22+5:302022-08-24T08:13:16+5:30

Hangsa Kumar : भाजप आणि सहयोगी पक्ष इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) च्या सुमारे 6,500 आदिवासींसह, हंगशा कुमार उत्तर त्रिपुरातील माणिकपूर येथे आयोजित एका जाहीर सभेत TIPRA मध्ये सामील झाले.

Top Tripura tribal leader leaves BJP with 6,500 followers | "सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलण्यापुरतेच", 6500 कार्यकर्त्यांसह मोठ्या नेत्याने भाजपला ठोकला रामराम

"सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलण्यापुरतेच", 6500 कार्यकर्त्यांसह मोठ्या नेत्याने भाजपला ठोकला रामराम

googlenewsNext

त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. आदिवासी नेते हुंगशा कुमार मंगळवारी आदिवासी-आधारित प्रमुख विरोधी पक्ष टिप्राहा (TIPRA) स्वदेशी प्रोग्रेसिव्ह प्रादेशिक आघाडीत सामील झाले. भाजप आणि सहयोगी पक्ष इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) च्या सुमारे 6,500 आदिवासींसह, हंगशा कुमार उत्तर त्रिपुरातील माणिकपूर येथे आयोजित एका जाहीर सभेत TIPRA मध्ये सामील झाले.

TIPRA सुप्रीमो आणि त्रिपुराचे माजी राजेशाही वंशज प्रद्योत बिक्रम माणिक्य देब बर्मन यांच्यासह इतर नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. ज्यात हजारो आदिवासी नागरिक उपस्थित होते. यावेळी हुंगशा कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलण्यापुरतेच आहे. प्रत्यक्षात याचा परिणाम ना आदिवासींवर झाला, ना राज्यातील बिगर आदिवासींवर झाला, असे ते म्हणाले.

दरम्यान, हुंगशा कुमार सध्या 30 सदस्यीय त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदेचे (TTAADC)  विरोधी पक्षनेते आहेत.  TTAADC ला मिनी-विधानसभा म्हटले जाते. TTAADC मध्ये भाजपचे नऊ सदस्य आहेत.  6 एप्रिल 2021 च्या निवडणुकीत TTAADC वर TIPRA ने सत्ता मिळवली होती.TIPRA ने गेल्या वर्षी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची TTAADC ताब्यात घेतली, तेव्हा CPI(M) च्या नेतृत्वाखालील डावे, काँग्रेस आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीनंतर 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामधील चौथी मोठी राजकीय शक्ती बनली.

'भाजप पुन्हा खोटी आश्वासने देणार'
TIPRA मोथाचे प्रमुख प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा म्हणाले की, भाजपने 2018 च्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने गेल्या 4.5 वर्षांत त्यांच्या कामात पूर्ण झाली नाहीत. 2023 मध्ये भाजपकडून पुन्हा खोटी आश्वासने दिली जातील. येत्या 15 दिवसांत भाजपचे दोन-तीन प्रमुख नेते मोथामध्ये सामील होतील, असेही ते म्हणाले.

'आमच्या पक्षावर प्रभाव पडणार नाही'
हंगशा कुमार यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते सुब्रत चक्रवर्ती म्हणाले, "आमचा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहोत. काही लोक बाजू बदलतात, त्यामुळे काही फरक पडत नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी काम करणाऱ्या अशा लोकांचा आमच्या पक्षावर प्रभाव पडणार नाही. आम्ही आधी देशासाठी आणि नंतर पक्षासाठी काम करतो. त्यांनी भाजप का सोडली? हे त्यांना विचारायला हवे".

Web Title: Top Tripura tribal leader leaves BJP with 6,500 followers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.