घुंगटधारी महिलेचे छायाचित्र बनले वादाचा विषय
By admin | Published: June 29, 2017 12:32 AM2017-06-29T00:32:28+5:302017-06-29T00:32:28+5:30
हरयाणा सरकारच्या ‘हरयाना संवाद’ मासिकाच्या ताज्या अंकात महिलांच्या डोक्यावरील घुंगटचे वर्णन राज्याची अस्मिता अशा शब्दांत करण्यात आले आहे.
चंदीगढ : हरयाणा सरकारच्या ‘हरयाना संवाद’ मासिकाच्या ताज्या अंकात महिलांच्या डोक्यावरील घुंगटचे वर्णन राज्याची अस्मिता अशा शब्दांत करण्यात आले आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावर डोक्यावरून घुंगट घेतलेल्या महिलेचे जे छायाचित्र आहे, त्यात तिचा चेहरा अजिबात दिसणार नाही, अशी काळजी घेण्यात आली आहे. अंकातील छायाचित्राखालच्या या अस्मितेच्या ओळींनी खळबळ निर्माण केली असून विरोधकांनी भाजपची प्रतिगामी मानसिकता यातून उघड झाल्याचा हल्ला केला आहे. छायाचित्राखालील ओळींत ‘घुंगट की आन-बान, म्हारा हरयाणा की पहचान’ असे म्हटले आहे.
राज्याचे मंत्री अनिल विज यांनी विरोधकांचा आरोप फेटाळला. ते म्हणाले, भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलली असून महिलांना घुंगट वापरण्याची सक्ती राज्यात नाही.
माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा आणि काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सत्ताधारी भाजप सरकारची मागासलेली मानसिकताच छायाचित्र व त्याखालील ओळीतून उघड झाली आहे.