हरियाणाचा विपुल गर्ग एआयपीएमटीमध्ये टॉपर

By admin | Published: August 17, 2015 11:37 PM2015-08-17T23:37:32+5:302015-08-17T23:37:32+5:30

अ.भा. वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत (एआयपीएमटी) २०१५ मध्ये हरियाणाच्या विपुल गर्ग याने पहिले तर राजस्थानच्या खुशी तिवारी हिने दुसरे

Topper of Haryana Vipul Garg AIPMT Topper | हरियाणाचा विपुल गर्ग एआयपीएमटीमध्ये टॉपर

हरियाणाचा विपुल गर्ग एआयपीएमटीमध्ये टॉपर

Next

नवी दिल्ली : अ.भा. वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत (एआयपीएमटी) २०१५ मध्ये हरियाणाच्या विपुल गर्ग याने पहिले तर राजस्थानच्या खुशी तिवारी हिने दुसरे स्थान पटकावले आहे. हे दोघेही खुल्या श्रेणीतील असून दिल्लीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात.
विपुलने ७२० पैकी ६९५ तर खुशीने ६८८ गुण पटकावले. बिहारची तेजस्विनी झा ही ६८२ गुण मिळवत तिसऱ्या स्थानी राहिली. १७ वर्षीय विपुल हा हरियाणातील जिंद जिल्ह्णातील एका बॅगविक्रेत्याचा मुलगा आहे. दुसरी टॉपर राहिलेल्या १७ वर्षीय खुशीचे आईवडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. ती राजस्थानच्या कोटा येथे शिकत होती. तिने जोधपूरच्या एम्समध्ये प्रवेश मिळविला होता, मात्र आता मौलाना आझाद महाविद्यालयात प्रवेश मिळवून एन्डोक्रायनॉलॉजीमध्ये भवितव्य घडवायचे आहे. (वृत्तसंस्था)
स्वप्न साकारल्याचा आनंद
माझे आणि मातापित्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. मी परीक्षेत नेहमीच अव्वल राहिलो आहे, मात्र वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत पहिले स्थान मिळेल याची खात्री नव्हती. यापूर्वीही मी या परीक्षेत चांगली कामगिरी केली असती मात्र ती रद्द झाल्यामुळे धक्का बसला होता. नंतर मिळालेल्या संधीचा लाभ घेत मी कमकुवत भागावर अधिक लक्ष केंद्रित केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Topper of Haryana Vipul Garg AIPMT Topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.