अश्लील संभाषणप्रकरणी प्राध्यापकासह तिघांना कोठडी करमाळा येथील आत्महत्या प्रकरण : तंटामुक्त ामिती अध्यक्ष व रा.कॉ. अध्यक्षाचा समावेश
By admin | Published: September 3, 2015 11:52 PM2015-09-03T23:52:57+5:302015-09-03T23:52:57+5:30
सोलापूर : करमाळा येथील विद्यार्थिनीबरोबर सलगी करणार्या प्राध्यापकाने भ्रमणध्वनीवरील क्लिप सोशल मीडियावरून प्रसारित केल्याने त्या पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक वामन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन रामचंद्र घोलप व केडगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोराडे या तिघांना सह जिल्हा न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
Next
स लापूर : करमाळा येथील विद्यार्थिनीबरोबर सलगी करणार्या प्राध्यापकाने भ्रमणध्वनीवरील क्लिप सोशल मीडियावरून प्रसारित केल्याने त्या पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक वामन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन रामचंद्र घोलप व केडगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोराडे या तिघांना सह जिल्हा न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. एका महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील बारावीतील विद्यार्थिनीबरोबर प्रा. वामन शिंदे नावाच्या शिक्षकाने भ्रमणध्वनीवरून ईल संभाषण करून त्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियात प्रसारित केली होती. ही बदनामी सहन न झाल्याने त्या पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी प्रा. वामन शिंदे यांना अटक करून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कट रचणे, फिर्यादीवर दबाव आणणे, फिर्यादीला पोलिसांपर्यंत पोहोचू न देणे, शिवाय ब्लॅकमेलिंग करणे या आरोपावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घोलप व केडगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोराडे यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयांनी तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली होती, त्याची मुदत गुरूवारी संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपींतर्फे अँड. धनंजय माने, अँड. भारत क?े, अँड. जयदीप माने, अँड. कमलाकर वीर तर सरकारतर्फे अँड. रामदास वागज यांनी काम पाहिले. अधिक तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तिरुपती काकडे करीत आहेत. (प्रतिनिधी)