पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार ही लाजिरवाणी बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2016 10:42 PM2016-02-07T22:42:22+5:302016-02-07T22:42:22+5:30
जळगाव- देशात समानतेची मूल्ये रूजविणारे महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. पण दुसर्या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याच्या मध्यवर्ती भागात महिलाविरोधी फतवे जातपंचायती काढत आहेत. समाजमूल्ये तुडवीली जात आहेत ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोळकर यांनी शहरात व्यक्त केले.
Next
ज गाव- देशात समानतेची मूल्ये रूजविणारे महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. पण दुसर्या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याच्या मध्यवर्ती भागात महिलाविरोधी फतवे जातपंचायती काढत आहेत. समाजमूल्ये तुडवीली जात आहेत ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोळकर यांनी शहरात व्यक्त केले. अल्पबचत भवनात समता परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ.दाभोळकर सहभागी झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष अरुण जाधव, अशोक पवार, अशोक बिर्हाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास महाजन, अंनिसचे डी.एस.कट्यारे, मिलिंद बागुल, भरत शिरसाठ, आय.सी.शेख, ए.एस.झोपे आदी उपस्थित होते. मारेकरी सापडत नाहीत याची खंतडॉ.नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन ३० महिने होत आले, पण अजूनही मारेकरी सापडले नाहीत. कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्येबाबतही तपास व्यवस्थित होत नाही. ही खेदजनक बाब असल्याचे डॉ.हमीद दाभोळकर म्हणाले. आंबेडकरांचे फक्त नाव घेतले जातेएकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांच्या नावाचा शासन उदोउदो करीत आहे. आंबेडकर यांचे लंडनमधील घर घेतले. पण दुसर्या बाजूला समाजमूल्ये दुर्लक्षित आहेत. समाजमूल्ये रूजविण्याची गरज आहे. डॉ.दाभोळकर म्हणाले. अंनिस देव, धर्माच्या विरोधात नाहीअंनिस देव, धर्माच्या विरोधात नाही. पण आमच्यावर धर्म बुडवायला निघाले, असा आरोप होतो. आमचा लढा देवाच्या नावाने होणारी फसवणूक, शोषण याविरोधात आहे, असेही त्यांनी सांगितले. बाल कल्याण मंत्र्यांवर टिकाशनि चौथर्यावर महिलांनी जाणे योग्य नसल्याचे म्हणणार्या राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यांनी स्वत: आपल्या वडीलांना अग्नीडाग दिला आहे. याचा अर्थ समानतेची फक्त भाषा केली जाते. अंमलबजावणी केली जात नाही. राज्यात अजूनही स्त्री पुरूष समानतेबाबत प्रबोधनाची गरज असल्याचे डॉ.हमीद दाभोळकर बाल कल्याण मंत्र्यांवर टिका करताना म्हणाले. शिक्षकांनी जातपात मोडण्यासाठी प्रयत्न करावेतशिक्षकांनी जातपात मोडण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी. राजकारण, समाजकारणात जातींना महत्त्व आले आहे. रोटी बेटी व्यवहार जातीनुसार होत असल्याने जाती पातींचा विषय पुढे येतो. अलीकडे तर महापुरूषांनाही जाती पातींमध्ये विभागण्यात आले आहे. जात पात नष्ट करण्यासाठी शिक्षकांनी प्रथम आपल्या मनातून जात काढून टाकावी. शिक्षकांनी विवेकशील समाज निर्मितीसाठी मूल्य रुजवायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.