आसाममध्ये पुरामुळे १३४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:04 AM2017-08-19T01:04:18+5:302017-08-19T01:04:20+5:30

आसाममध्ये गेल्या बारा तासांत पुराने आणखी दहा जणांचा जीव घेतला असल्यामुळे गेल्या एप्रिलपासून पुरात मरण पावलेल्यांची संख्या १३४ झाली आहे.

A total of 134 people died due to floods in Assam | आसाममध्ये पुरामुळे १३४ जणांचा बळी

आसाममध्ये पुरामुळे १३४ जणांचा बळी

Next

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या बारा तासांत पुराने आणखी दहा जणांचा जीव घेतला असल्यामुळे गेल्या एप्रिलपासून पुरात मरण पावलेल्यांची संख्या १३४ झाली आहे. नद्या भरभरून वाहिल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर जमीन जलमय झाल्यामुळे हे बळी गेले.
दहा आॅगस्टपासून नव्याने पूर यायला सुरवात होऊन त्यात ४९ लोक मरण पावले, असे अधिकाºयांनी बुधवारी सांगितले. राज्यातील ब्रह्मपुत्रा, धनसिरी, जिया भराली, कोपिली, बेकी आणि कुशियाला या प्रमुख अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर वाहात असल्याचे राज्याच्या नैसर्गिक आपत्ती निवारण प्राधिकरणच्या अधिकाºयांनी सांगितले. आसाममध्ये पुराच्या आलेल्या दुसºया लाटेने ४८१ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या प्रसिद्ध काझिरंगा नॅशनल पार्कचा ८० टक्के भाग पाण्यात बुडाला असून सात गेंड्यांसह १४० वन्यप्राणी मरण पावले आहेत. आसाममधील हा यावर्षीचा दुसरा पूर आहे. दोन्ही पुरांमध्ये मिळून राज्यात ३00 हून अधिक वन्यप्राणी मरण पावले आहेत. रोजच्या रोज जनावरांचे मृतदेह सापडत आहे. तिथे १0 आॅगस्टपासून सात गेंडे, १२२ दलदलीत राहणारी हरणे, दोन हत्ती, तीन जंगली डुकरे, दोन हरणे, तीन सांभार, म्हैस आणि एक साळिंदर मरण पावले आहे. (वृत्तसंस्था)
>प्राण्यांची वाताहत
सातपैकी सहा गेंडे पुरात बुडाले, तर एक नैसर्गिक कारणांनी मरण पावला. ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी १0 आॅगस्ट रोजी डिफ्लू नदीच्या माध्यमातून काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये शिरले. या पार्कचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात झालेला आहे.
पाण्यात अडकलेले प्राणी वाचवण्याचे व मृतदेह मिळवण्याचे आणि किती
प्रकारचे प्राणी पाण्यात अडकून पडले आहेत किंवा मरण पावले आहेत, त्याची माहिती पार्कचे संरक्षक, टास्क फोर्स, प्रोटेक्शन फोर्स व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून घेतली जात आहे.
आसामच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ न, त्यांना राज्यातील गंभीर पूरपरिस्थितीची माहिती दिली.
आसामसाठी आर्थिक मदत देण्याचे देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी पुरोहित यांना दिले.

Web Title: A total of 134 people died due to floods in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.