जम्मू-काश्मीर: पुलवामातील एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 07:51 AM2017-11-03T07:51:12+5:302017-11-03T07:52:08+5:30
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरुवारीदेखील(2 नोव्हेंबर) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातही दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरुवारीदेखील(2 नोव्हेंबर) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातही दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली, या घटनेत एक जवान शहीद झाला. यानंतर काही तासांनी चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. याशिवाय सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारातही बीएसएफचा एक जवान शहीद झाला.
पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी सांगितले की, जवानांनी संध्याकाळी पम्पोर परिसरातील संबूरा गावाला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. या परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार ही शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीदेखील दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं.
सांबामध्ये BSF जवान शहीद
यादरम्यान, नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, यामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला.
Pulwama (J&K) Encounter: Total 2 security personnel lost their lives in encounter w/terrorists in Samboora village, last night.
— ANI (@ANI) November 3, 2017
J&K: The terrorist who was gunned down in the encounter at Pulwama's Samboora village belonged to JeM & was named Badar.
— ANI (@ANI) November 3, 2017