लोकसहभागातून काढला साडे नऊ लाख घनमीटर गाळ ७३ गावांमध्ये काम सुरु : १६ कोटी ६६ लाखांचा खर्च
By admin | Published: June 14, 2016 05:59 PM2016-06-14T17:59:30+5:302016-06-14T17:59:30+5:30
जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजनेतंर्गत २३२ गावांतील ५९९ कामांच्या माध्यमातून २६ लाख ६४ हजार ९८३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
Next
ज गाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजनेतंर्गत २३२ गावांतील ५९९ कामांच्या माध्यमातून २६ लाख ६४ हजार ९८३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.चाळीसगाव व भडगाव तालुक्यात सर्वाधिक कामेजिल्हा प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून नाला खोलीकरण तसेच अन्य कामे सुरु आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांमध्ये गाळ काढण्याचे कामे सुरु आहेत. त्यापाठोपाठ भडगाव तालुक्यात ११ गावांमध्ये काम सुरु आहे. या कामांमधून तब्बल दोन लाख ५५ हजार ३१५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील पाच गावांमधून तीन लाख ८५ हजार ७८६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात सर्वाधिक शासकीय कामेजिल्हा प्रशासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण, गाळ काढणे तसेच विहिर खोलीकरणाचे कामे सुरु आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील ५८ गावांमध्ये शासनातर्फे कामे सुरु आहेत. शासनातर्फे १६ लाख ९ हजार ६४५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यापाठोपाठ जळगाव तालुक्यातील १२ गावांमधून एक लाख ५५ हजार ८ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.१६ कोटी ६६ लाखांचा खर्चशासकीय योजनेतून गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ कोटी २४ लाखांचा खर्च केला आहे. त्यात सर्वाधिक ३ कोटी ५० लाखांचा खर्च हा अमळनेर तालुक्यावर करण्यात आला आहे. तर एरंडोल तालुक्यात एक रुपयांचा देखील खर्च करण्यात आलेला नाही. लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामांवर सात कोटी ४२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक खर्च दोन कोटी ७७ लाख इतका खर्च पाचोरा तालुक्यात झाला आहे. तर एरंडोल व रावेर तालुक्यात ६६ हजारांचा खर्च करण्यात आला आहे.एक लाख १७ हजार मीटरची रुंदी वाढलीशासकीय योजना व लोकसहभागातून गाळ काढल्यामुळे तब्बल एक लाख १७ हजार ५०९ मीटरचे रुंदीकरण व खोलीकरण झालेले आहे. याचा सर्वाधिक लाभ हा जामनेर तालुक्याला होणार आहे. त्यापाठोपाठ अमळनेर व भडगाव तालुक्यांना होणार आहे.