चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:40 AM2024-09-16T09:40:50+5:302024-09-16T09:42:17+5:30

Kolkata Crime News: कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येमुळे उफाळलेला संताप अद्याप शांत झालेला नाही. अशा परिस्थितीतच कोलकात्यामधील आणखी एका सरकारी रुग्णालयात छेडछाडीची घटना घडली आहे.

Touched wrongly, then undressed and..., another shocking incident at a hospital in Kolkata   | चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना  

चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना  

कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येमुळे उफाळलेला संताप अद्याप शांत झालेला नाही. अशा परिस्थितीतच कोलकात्यामधील आणखी एका सरकारी रुग्णालयात छेडछाडीची घटना घडली आहे. मिलालेल्या माहितीनुसार सरकारी रुग्णालयात झोपलेल्या एका २६ वर्षांच्या महिलेसोबत छेडछाडीची घटना घडली आहे. याबाबत तिने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर महिला ही कोलकाता येथील आयसीएचमधील मुलांसाठीच्या वॉर्डमध्ये झोपलेली असताना तिच्यासोबत ही घटना घडली.

याबाबत समोर आलेल्या अधिक माहितीनुसार तक्रारीमधून आरोपीचं नाव तनय पाल (२६) असं असल्याचं समोर आलं आहे. तो रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. त्याने मुलांच्या वॉर्डमध्ये प्रवेश केला, तसेच पीडित महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तसेच तिचे कपडे उतरवले. एवढंच नाही तर आरोपीने या घटनेचं त्याच्या मोबाईलमध्ये चित्रिकरणही केलं, असाही आरोप तक्रारीमधून करण्यात आला आहे. 

ही घटना कोलकातामधील आरजी कर सरकारी रुग्णालयातील एका ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर काही दिवसांनीच घडली आहे. दरम्यान, आरजी कर रुग्णालयातील घटनेप्रकरणी आरोपी संजय रॉय याला अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर भारतीय दंड विधानातील विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.  

Web Title: Touched wrongly, then undressed and..., another shocking incident at a hospital in Kolkata  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.