चौघुले प्लॉट भागात सलग तिसर्‍या दिवशी तणावपुर्ण शांतता

By admin | Published: March 13, 2016 12:04 AM2016-03-13T00:04:53+5:302016-03-13T00:04:53+5:30

फोटो

Tough calm for third consecutive day in Choughhula plot areas | चौघुले प्लॉट भागात सलग तिसर्‍या दिवशी तणावपुर्ण शांतता

चौघुले प्लॉट भागात सलग तिसर्‍या दिवशी तणावपुर्ण शांतता

Next
टो
जळगाव: किशोर चौधरी याच्या खूनाच्या पार्श्वभूमीवर शनी पेठ व चौघुले प्लॉट भागात सलग तिसर्‍या शनिवारी दिवशी तणावपुर्ण शांतता होती.या सर्व भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त कायम होता. पोलीस स्टेशन, शनी पेठ परिसर, चौघुले प्लॉट व मुख्य रस्ता या भागात आरसीपीचे जवान तैनात करण्यात आले. दरम्यान, या खून प्रकरणात शनिवारी सागर जगन्नाथ सपकाळे (वय २६ रा.प्रजापत नगर,जळगाव) या संशयित आरोपीस शनी पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्य आरोपी सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलकर व पंकज वासुदेव पाटील यांच्या शोधासाठी आणखी दुसरे पथक पाठविण्यात आले. शुक्रवारी शेगाव येथे गेलेल्या पथकाला अद्याप आरोपींचे धागेदोरे काहीच मिळाले नाहीत, गुप्त माहितीच्या आधारावर एक दुसरे पथक तातडीने रवाना करण्यात आले.
या गुन्‘ात गणेश विश्वास सपकाळे याची बहिण अंजना किशोर कोळी हिला शुक्रवारी सकाळी डिकसाई येथून अटक करण्यात आली होती. दरम्यान, अटकेतील आरोपींची संख्या आता नऊवर पोहचली आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांचे गुन्‘ात नाव असले तरी या गुन्‘ात त्यांचा थेट संबंध व तसा कोणाताही सक्षम पुरावा पोलिसांकडे नसल्याने अटकेची कारवाई करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
महिलांनी आरोप नाकारले
मुख्य आरोपी सुरेश सोनवणे याची पत्नी रत्नाबाई सोनवणे हिच्यासह अटकेतील वैशाली उमेश कांडेलकर, रंजना भगवान कोळी, सखुबाई विश्वास सपकाळे व योगिता गणेश सपकाळे या सर्व महिलांना शुक्रवारी पोलीस व न्यायालयातही त्यांच्यावरील आरोप नाकारले, घटनेच्यावेळी आम्ही तेथे नव्हतोच. घरीच होतो असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात गुन्‘ातील संशयित आरोपी व मयत हे एकत्र दिसून येत आहेत.
कोट..
गुन्‘ातील फरार आरोपींच्या शोधासाठी दुसरे पथक पाठविण्यात आले आहे. तर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
-आत्माराम प्रधान, पोलीस निरीक्षक

Web Title: Tough calm for third consecutive day in Choughhula plot areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.