ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:16 AM2018-04-13T04:16:05+5:302018-04-13T04:16:05+5:30

आग्रामध्ये बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ताजमहालालाही बसला आहे.

The tower's minaret collapsed in the Taj Mahal | ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले

ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले

Next

नवी दिल्ली- आग्रामध्ये बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ताजमहालालाही बसला आहे. या वादळामुळे ताजमहालाच्या दक्षिण गेट आणि रॉयल गेट्सचे दगडी मिनार कोसळले. तसेच, ताजमहालचा पांढ-या रंगाचा छोटा घुमटही
पडून तुटला आहे. ताजमहालचा मुख्य दरवाजा आणि दरवाजा-ए-रौजावरील १२ फुटी मिनारही वादळात कोलमडला आहे. ताजमहालचे दर्शन सर्वांत प्रथम याच दरवाजातून होत असते. वादळामुळे आग्रा शहरात प्रचंड नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले दिसले. २०१६मध्ये ताजमहालचे मिनार कोसळल्याची घटना घडली होती. साफसफाईच्या कामामुळे हे मिनार कोसळले असावेत, अशी शक्यता तेव्हा वर्तविण्यात आली होती.

Web Title: The tower's minaret collapsed in the Taj Mahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.