बापरे! मर्सिडीज बेंझ कारच्या धडकेने ट्रॅक्टरचे दोन तुकडे; पाहा अपघाताचा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:45 AM2022-09-27T09:45:54+5:302022-09-27T09:46:47+5:30
ही घटना सोमवारी घडली. तिरुपतीजवळील चंद्रगिरी बायपास रोडवर हा अपघात झाला. येथे अचानक चुकीच्या बाजूने येणारा ट्रॅक्टर मर्सिडीज बेंझ कारसमोर आला.
तिरुपती - आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे झालेल्या अपघातादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी ट्रॅक्टर आणि मर्सिडीज बेंझ(Mercedes-Benz) कारच्या धडकेने ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले, या दुर्घटनेत कारमधील सर्व लोकांना किरकोळ दुखापत झाली. तर ट्रॅक्टर चालकही थोडक्यात बचावला आहे.
ही घटना सोमवारी घडली. तिरुपतीजवळील चंद्रगिरी बायपास रोडवर हा अपघात झाला. येथे अचानक चुकीच्या बाजूने येणारा ट्रॅक्टर मर्सिडीज बेंझ कारसमोर आला. ट्रॅक्टर आणि मर्सिडीजमध्ये जोरदार धडक होऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. या अपघातात ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला आहे. नुकतेच देशातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता, मिस्त्री देखील मर्सिडीज बेंझ कारमधून प्रवास करत होते. या अपघातानंतर मर्सिडीजच्या सेफ्टी फीचरवरही प्रश्न उपस्थित झाले होते.
मर्सिडीजच्या धडकेत ट्रॅक्टरचे २ तुकडे, चालक थोडक्यात बचावला, तिरुपती येथील घटना #Tirupatipic.twitter.com/v5FmNyRLe5
— Lokmat (@lokmat) September 27, 2022
मात्र, मिस्त्री मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4मॅटिक प्रोग्रेसिव्ह कारमध्ये प्रवास करत होते ज्यात सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. NCAP ने या कारला सेफ्टी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग दिली आहे. या कारमध्ये 1950cc इंजिनसह 7 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. यामध्ये रियर पॅसेंजर कर्टन एअरबॅग, ड्रायव्हर फ्रंटल एअरबॅग, फ्रंट पॅसेंजर फ्रंट एअरबॅग, ड्रायव्हर नी एअरबॅग, ड्राईव्ह साइड एअरबॅग यांचा समावेश आहे. कारमध्ये इंजिन इमोबिलायझर, लेन वॉच कॅमेरा/साइड मिरर कॅमेरा देण्यात आला आहे.
याशिवाय, तुम्ही इतर सुरक्षा वैशिष्ट्ये पाहिल्यास, ASR/ट्रॅक्शन कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-डिमिंग रीअर-व्ह्यू मिरर, ISOFIX (चाइल्ड-सीट माउंट), सेंट्रल लॉक सिस्टम, अँटी लॉक ब्रेकिंगसाठी डोर अजर सिस्टम (ABS), ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन), ESP (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम), EBA (इलेक्ट्रॉनिक ब्रेक असिस्ट), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TC/TCS), हाय स्पीड अलर्ट सिस्टम, पॅसेंजर साइड सीट -बेल्ट रिमाइंडर उत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.