ट्रॅक्टर परेड Video: दिल्लीत शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष; वाहनांची तोडफोड, उग्र आंदोलकांवर लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:14 PM2021-01-26T12:14:12+5:302021-01-26T12:14:45+5:30
Farmer protest, tractor Rally : अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत. अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड्य तोडले आहेत. यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला.
दिल्लीमध्येप्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत. अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड तोडले आहेत. यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला.
दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अक्षरधामच्या आधी पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.
#WATCH Protestors push through police barricading on Delhi-Meerut Expressway near Pandav Nagar#FarmLawspic.twitter.com/X452wvwBZ6
— ANI (@ANI) January 26, 2021
आजचा दिवस देशासाठी खूप महत्वाचा आहे. एकीकडे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. दिल्लीच्या सीमेवर सध्या 60000 हून अधिक ट्रॅक्टर उभे ठाकले आहेत. परंतू, सिंघू आणि तिक्री बॉर्डरवर पोलिसांनी रातोरात बॅरिकेड टाकून रस्ते अडविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे दोन्ही सीमांवरील बॅरिकेड हटवून शेतकऱ्य़ांनी दिल्लीकडे कूच केले आहे.
#WATCH Protestors seen on top of a police vehicle and removing police barricading at Mukarba Chowk in Delhi#FarmLawspic.twitter.com/TvDWLggUWA
— ANI (@ANI) January 26, 2021
दिल्लीला जाण्यासाठी केएमपी-केजीपीवर जवळपास 25 ते 30 किमीच्या रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रवेश देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सिंघु बॉर्डर उघडली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला रवाना होणार आहेत. मात्र, काही ठिकाणी बॅरिकेड्स असल्याने ते हटवून काही शेतकरी पुढे जाऊ लागले आहेत.
Delhi: Police used tear gas shells after isolated incidents of scuffle between protestors and police took place at Sanjay Gandhi Transport Nagar and protestors took over a police vehicle pic.twitter.com/bbu8nMnHNp
— ANI (@ANI) January 26, 2021
नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर 62 किलोमीटर, तिक्री बॉर्डरवर 63 किलोमीटर आणि गाझीपूर बॉर्डरवर 46 किलोमीटर ट्रॅक्टर परेड पोलिसांच्या बंदोबस्तात काढली जाणार आहे. यामध्ये एक ट्रॅक्टर दुसऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणार नाही. असे केल्यास त्या ट्रॅक्टरला परेडमधून बाहेर काढले जाणार आहे, असे शेतकरी नेत्यांनी ठरविले आहे. ट्रॅक्टर परेडवेळी सामान्य लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक 100 मीटरवर व्हॉलिंटिअर तैनात करण्यात येणार आहेत. परेडच्या सुरुवातीला ज्येष्ठ शेतकरी आणि नेते असणार आहेत. त्यानंतर तरुण शेतकरी मोर्चा सांभाळणार आहेत. ही परेड रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. तसेच कोणीही वादग्रस्त घोषणा किंवा बॅनरबाजी करणार नाही. तसेच हत्यारे किंवा दारू घेऊन कोणीही परेडमध्ये येणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
#WATCH Protestors at Karnal bypass break police barricading to enter Delhi as farmers tractor rally is underway in the national capital#FarmLawspic.twitter.com/pzfJs6Ioef
— ANI (@ANI) January 26, 2021