मध्यप्रदेशातील नीमचमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली उलटून 11 जण ठार
By Admin | Published: May 25, 2017 08:09 PM2017-05-25T20:09:23+5:302017-05-25T20:14:50+5:30
यात्रेकरुंना घेऊन जाणारी ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नीमच, दि. 25 - यात्रेकरुंना घेऊन जाणारी ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.
मध्यप्रदेशातील नीमच येथील राष्ट्रीय महामार्गावर कानका फंटा येथे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, येथील मंदसौर जिल्ह्यातील खेडेरिया काचरिया गावातील सर्व रहिवाशी असून ते राज्यस्थानमधील सांवलिया सेठच्या दर्शनासाठी ट्रॅक्टरमधील जात होते. यावेळी ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिला, चार मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर, जखमींना उपचारांसाठी नीमच येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेकजण मध्यप्रदेशातील इंदूर येथील रहिवाशी होते. या घटनेतील मृत्यूमुखींच्या कुटुंबीयांना सुद्धा शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली होती.
ट्रॅक्टर अपघातातील मृतांची नावे...
1. मोहनलाल जाट, 2. नीलेश बलाई, 3. दीपक बलाई, 4.वर्षा बलाई, 5. लोकेश लुहार, 6. मथरी लुहार, 7. भागुबाई भलाई, 8. भगुडी बलाई, 9. भंवरी बलाई, 10. कारी बाई, 11. मांगू बाई
Madhya Pradesh: 11 dead and 12 critically injured after a tractor trolley carrying pilgrims overturned in Neemuch district (earlier visuals) pic.twitter.com/m3lVAGMRVe
— ANI (@ANI_news) May 25, 2017