ट्रेडमार्क कॉम्प्लेक्सची पार्किंग बळकावली
By admin | Published: March 14, 2016 12:03 AM2016-03-14T00:03:38+5:302016-03-14T00:03:38+5:30
गाडगेनगर भागातील ट्रेडमार्क कॉम्प्लेक्स या संकुलाची पार्किंग लुल्ला नामक व्यक्तीने बळकावल्याचा आरोप तेथील गाळेधारकांनी केला आहे.
Next
ब रामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने बारामती येथील ॲक्सिस बँकेत १० कोटींची रक्कम परस्पर ठेवल्याचा आरोप शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या व्याजातून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची जाचक यांची तक्रार आहे. कारखान्याने २०१४-१५ च्या थकीत एफआरपीची ८ कोटी रक्कम दिलेली नाही. त्यासाठी कारखान्याकडे पैसे उपलब्ध नसल्याचे कारण दिले आहे. मात्र, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, संचालक मंडळाने १० कोटींची रक्कम बारामती येथील ॲक्सिस बँकेत ३ महिने कोणालाही कळू न देता ठेवली होती. याबाबत संचालक मंडळात वाद, आरोप-प्रत्यारोप झाल्याचा दावा जाचक यांनी केला आहे. खासगी बँकेत पैसे ठेवल्याने सभासदांच्या व्याजाचे नुकसान झाले आहे. कारखान्याची १० हजार टन मळी रीतसर टेंडर काढून ६ हजार ७५० रुपये प्रतिटन दराने विकली होती. मात्र, तीच मळी परत ६ हजार ५० रुपये प्रतिटन दराने विक्री केली आहे. त्यामुळे या व्यवहारात प्रतिटन ७०० रुपये तोटा झाला आहे. ही रक्कम ७० लाख होते. मळी खरेदी करण्याकडून जाणीवपूर्वक डिपॉझिट घेतलेले नाही. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या दराने टेंडर दिल्यानंतर मळी उचलण्याबाबत संचालक मंडळाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कारखान्याचे, पर्यायाने सभासदांचे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे जाचक यांनी नमूद केले आहे. कार्यकारी संचालक, चिफ अकाउटंट यांनी हे प्रकार मान्य केल्याचा दावा देखील जाचक यांनी केला आहे. मात्र, या व्यवहाराचे लेखी पत्र मागणी करूनदेखील दिलेले नाही. त्यामुळे सभासदांच्या ऐच्छिक ठेवींचे भवितव्य काय, असा सवाल जाचक यांनी केला आहे. या वेळी बाळासाहेब कोळेकर, शिवाजीराव निंबाळकर, सतीश काटे, विशाल निंबाळकर, मालोजीराजे गायकवाड, अशोकराव काळे उपस्थित होते.