दारुमुक्ती तंटामुक्ती ही सापटण्याची परंपरा

By admin | Published: February 20, 2016 02:01 AM2016-02-20T02:01:25+5:302016-02-20T02:01:25+5:30

तंटामुक्त आणि दारुमुक्त गावे करण्यासाठी राज्य सरकार विशेष अभियान राबवत असले तरी त्यात त्यांना यश आलेले नाही; पण माढा तालुक्यातील सापटणे गाव स्थापनेपासून तंटामुक्त व नशामुक्त असून बिनविरोध निवडणूक करण्याची प्रथा प्रथमच मोडली गेली आहे. गावचा कारभार ढवळे परिवाराकडेच होता आणि आजही आहे. स्व. आण्णासाहेब ढवळे यांचा दरारा केवळ सापटण्यातच नव्हे तर आजूबाजूच्या गावातही होता. आण्णांकडे आलेले तंटे निकाली काढण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आजूबाजूच्या गावचे लोकही तंटे मिटवण्यासाठी आण्णांच्या दरबारात यायचे. त्यांच्याबद्दल जनतेमध्ये आदरयुक्त दरारा होता. आजही त्यांच्या कुटुंबातील तात्यासाहेब ढवळे हे निवाडे करण्याचे काम करतात. एक नव्हे अनेक समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे येतात. गावाला निर्मलग्राम व तंटामुक्त पुरस्कार मिळाले आहेत.

The Tradition of Dissimmemination | दारुमुक्ती तंटामुक्ती ही सापटण्याची परंपरा

दारुमुक्ती तंटामुक्ती ही सापटण्याची परंपरा

Next
टामुक्त आणि दारुमुक्त गावे करण्यासाठी राज्य सरकार विशेष अभियान राबवत असले तरी त्यात त्यांना यश आलेले नाही; पण माढा तालुक्यातील सापटणे गाव स्थापनेपासून तंटामुक्त व नशामुक्त असून बिनविरोध निवडणूक करण्याची प्रथा प्रथमच मोडली गेली आहे. गावचा कारभार ढवळे परिवाराकडेच होता आणि आजही आहे. स्व. आण्णासाहेब ढवळे यांचा दरारा केवळ सापटण्यातच नव्हे तर आजूबाजूच्या गावातही होता. आण्णांकडे आलेले तंटे निकाली काढण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आजूबाजूच्या गावचे लोकही तंटे मिटवण्यासाठी आण्णांच्या दरबारात यायचे. त्यांच्याबद्दल जनतेमध्ये आदरयुक्त दरारा होता. आजही त्यांच्या कुटुंबातील तात्यासाहेब ढवळे हे निवाडे करण्याचे काम करतात. एक नव्हे अनेक समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे येतात. गावाला निर्मलग्राम व तंटामुक्त पुरस्कार मिळाले आहेत.
चौकट
तंटामुक्तीचे फळ
स्व. आण्णासाहेब ढवळे हे तंटे मिटवण्यात प्रसिद्ध होते. चाकण येथील लुंकड यांच्या कंपनीत संपावर गेलेल्या कामगारांचा तंटा आण्णांनी मिटवला होता. तेव्हा खूश झालेल्या लुंकड शेठनी आण्णांना काहीतरी घ्या, असा आग्रह केला. तेव्हा आण्णांनी लुंकड शेठला सापटणेला आणले आणि या गावासाठी काय द्यायचे ते द्या, असे सांगितले. तेव्हा लुंकड शेठनी गावाला वेस बांधून दिली. एक मशीद, तालीम आणि हायस्कूलला आठ खोल्या बांधून दिल्या. तसेच अनेक पडकी घरे बांधकामासाठी आणि गावाला रंग देण्यासाठी त्यांनी मदत केली. आण्णांच्या तंटामुक्तीचा अख्ख्या गावाला असा फायदा झाला.
पंढरपूरला जाणार्‍या बहुतांशी दिंड्या सापटणेमार्गे जातात. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था सापटणे ग्रामस्थ करतात. अनेक दिंड्या येतात. त्यासाठी वर्षातून एकदा ज्वारी, गहू असे धान्य गोळा करून ठेवले जाते आणि त्यातून वारकर्‍यांना अन्नदान केले जाते.
गावात लोकवर्गणीतून बांधलेले सुमारे एक कोटीचे हनुमान व महादेव मंदिर असून त्यामध्ये इतर देवतांच्याही मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. गावातले रस्ते काँक्रीटचे आहेत. घरोघरी नळपाणीपुरवठा योजना चालू असून लवकरच होळे पाणीपुरवठा योजनेचे पाणी येणार आहे. हरिजन वस्ती सुधारणा केली आहे. गावच्या दोन्ही जि. प. शाळांना आयएसओ दर्जा मिळाला आहे.

Web Title: The Tradition of Dissimmemination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.