पारंपरिक वेशभूषा, सुसाट वेग, देसी भाभीने रस्त्यावर दणक्यात पळवली बुलेट, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:16 PM2022-12-14T12:16:29+5:302022-12-14T12:17:18+5:30

Viral Video: एका देसी भाभीचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ही महिला पारंपरिक वेशभुषेमध्ये दणक्यात बुलेट चालवताना दिसत आहे. या महिलेला बुलेट चालवताना पाहून लोक बघतच राहिले. 

Traditional dress, fast speed, desi bhabhi runs a bullet in the street, video is going viral | पारंपरिक वेशभूषा, सुसाट वेग, देसी भाभीने रस्त्यावर दणक्यात पळवली बुलेट, व्हिडीओ होतोय व्हायरल

पारंपरिक वेशभूषा, सुसाट वेग, देसी भाभीने रस्त्यावर दणक्यात पळवली बुलेट, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडीओ शेअर आणि व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ असे असतात की जे त्यातील वेगळेपणामुळे लोकांना खूप आवडतात. तसेच असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आता एका देसी भाभीचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ही महिला पारंपरिक वेशभुषेमध्ये दणक्यात बुलेट चालवताना दिसत आहे. या महिलेला बुलेट चालवताना पाहून लोक बघतच राहिले. 

Sona_omi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देसी भाभीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील देशी अवतारामधील या महिलेचा बायकर अंदाज लोकांना खूप आवडत आहे. पारंपरिक कपडे, माथ्यावर टिळा, डोक्यावर पदर आणि रस्त्यावरून दणक्यात बुलेट चालवणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ खूप पसंद केला जात असून, या व्हिडिओला ५० हजारांहून अधिक लाईक मिळाले आहेत.

व्हायरल व्हिडीओमधील महिलेने पारंपरिक गुर्जर वेशभूषा केली आहे. तसेच ती रस्त्यावरून बिनधास्त अंदाजात बुलेट चालवत आहे. त्यामुळे तिला पाहणारे आश्चर्यचकीत होत आहे. या महिलेसोबत बुलेटवर मागे आणखी एक महिला बसली आहे. यादरम्यान, या महिलेचा व्हिडीओ कुणीतरी बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ लोकांनाही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  

Web Title: Traditional dress, fast speed, desi bhabhi runs a bullet in the street, video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.