वाहतूकदारांचा संप कायम
By Admin | Published: October 2, 2015 11:55 PM2015-10-02T23:55:43+5:302015-10-02T23:55:43+5:30
टोल प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसने (एआयएमटीसी) पुकारलेला देशव्यापी बेमुदत संप शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिला.
नवी दिल्ली : टोल प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसने (एआयएमटीसी) पुकारलेला देशव्यापी बेमुदत संप शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. या संपामुळे देशाच्या अनेक भागांंमधील वस्तूंचा पुरवठा ठप्प पडला होता.
दूध, पालेभाज्या आणि औषधी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला या संपातून वगळण्यात आले असले तरी तामिळनाडू, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसह अनेक राज्यांत संपाचा प्रभाव जाणवला. ‘आपल्या प्रश्नावर व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी सरकार पुढे येत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क))आमचा टोल देण्याला अजिबात विरोध नाही. पण या प्रणालीला वार्षिक स्वरूप देण्याची आमची मागणी आहे. सरकारने इलेक्ट्रॉनिक टोल संग्रह प्रणाली लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु ही प्रणाली व्यवहार्य नाही,’ असे एआयएमटीसीचे अध्यक्ष भीम वाधवा यांनी म्हटले आहे.