शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीची तटबंदी... नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:21 PM2024-02-21T15:21:09+5:302024-02-21T15:22:07+5:30

Farmers’ ‘Dilli Chalo’ March : महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Traffic jams hit Delhi-NCR as cops seal Singhu, Tikri borders over farmers’ ‘Dilli Chalo’ march | शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीची तटबंदी... नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीची तटबंदी... नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी

Farmers’ ‘Dilli Chalo’ March (Marathi News)नवी दिल्ली :  आज दिल्ली-एनसीआरच्या वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे दिल्लीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीतील एक कोटीहून अधिक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाझीपूरमध्ये अनेक ठिकाणी रुग्णवाहिका जाममध्ये अडकल्या आहेत. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आंदोलकांच्या मोर्चापूर्वीच दिल्लीत वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. कालिंदी कुंज, गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडी झाली आहेत. त्याचवेळी नोएडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाच्या घोषणेमुळे वाहतूक कोंडी वाढण्याचा धोका आहे. डीएनडी उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावून सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग खूपच मंदावला झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी हरयाणातील शंभू सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. त्याच धर्तीवर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. टिकरी बॉर्डरवर 13 थरांची सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांकडून हायड्रोलिक आणि पोकलेन मशीनचीही तयारी सुरू आहे. आज दिल्लीच्या सीमेवर कडक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रत्येक एंट्री पॉइंटवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमा मजबूत केल्या आहेत. हरयाणाच्या सिंघू आणि टिकरीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. काँक्रीट आणि लोखंडी खिळ्यांनी बनवलेल्या बॅरिकेड्सचे अनेक स्तर तेथे बसविण्यात आले आहेत. गाझीपूर सीमेवरील दोन मार्गिकाही बंद करण्यात आल्या आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गरज भासल्यास बुधवारी गाझीपूर सीमाही बंद केली जाऊ शकते. पण दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि एनएच-9 वर यूपी गेट सीमेवर प्रचंड गर्दी असल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते.  तसेच, बॅरिकेडिंगमुळे मध्य दिल्लीतील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणामध्येही प्रत्येक कोपऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, ट्रॅक्टर-ट्रॉली, बुलडोझर, हायड्रोलिक मशिन, क्रेन आणि खोदकामाच्या साधनांनी सुसज्ज शंभू सीमा आणि खनौरी सीमावर्ती भागातील 20 हजार शेतकरी सकाळी 11 वाजता दिल्लीकडे मोर्चा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वेळीही शेतकरी आंदोलनादरम्यान वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान, ग्रेटर नोएडातील वाहतुकीवरही आज परिणाम होऊ शकतो. कारण ग्रेटर नोएडातील स्थानिक शेतकऱ्यांचा एक गट पंजाबमधील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निषेध मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे परी चौक आणि सूरजपूर दरम्यानची वाहतूक प्रभावित होऊ शकते.
 

Web Title: Traffic jams hit Delhi-NCR as cops seal Singhu, Tikri borders over farmers’ ‘Dilli Chalo’ march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.