ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडली, रिक्षावाल्यानं गळ्यात फास लटकवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:27 PM2020-01-06T12:27:08+5:302020-01-06T12:27:24+5:30
पठाणकोट येथील स्थानिक पीर बाबा चौकात एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा
हरयाणा - ट्रॅफिक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईला अनेकजण विरोध करतात. कधीकधी वाहतूक पोलिस अन् वाहनचालकांमध्ये बाचाबाची, हाणामारही होते. बहुदा दुचाकीचालक अन् रिक्षाचालकांचा ट्रॅफिक पोलिसांसोबत वाद होत असतो. त्यातच, केंद्र सरकारने वाहतुकीची नवीन नियमावली बनवली असून त्यानुसार दंडाची कारवाई होत आहे. मात्र, अनेकदा पोलिसांकडून अतिरेकही करण्यात येतो. पठाणकोट येथे एका रिक्षाचालकाने चक्क रिक्षातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
पठाणकोट येथील स्थानिक पीर बाबा चौकात एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा संताप व्यक्त करत चक्क गळफास घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी 11 वाजता एका रिक्षावाल्याचे चलन फाडण्यात आले. त्यामुळे, संतापलेल्या रिक्षाचालकाने चक्क रिक्षातील दोरी घेऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून कुठलिही कारवाई होईल, त्याअगोदरच इतर सहकारी रिक्षाचालकांनी त्यास अडवले. गळ्यात टाकलेला दोर बाजूला करत त्याची समजूत काढली. या घटनेनंतर ट्रॅफिक पोलीस अधिकारी सुरेंद्र कुमार यांनी म्हटले की, या रिक्षाचालकास पहिल्यांदाच दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, या ऑटो ड्रायव्हरने ट्रॅफिक नियमांचे पालन न केल्याने त्यास अडवले असता तो संताप व्यक्त करू लागला. ट्रॅफिक पोलिसांकडून कुणावरही विनाकारण कारवाई केली जात नाही. जे ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करतात, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सुरेंद्र कुमार यांनी म्हटले.