311 वेळा मोडले वाहतुकीचे नियम, जप्त झाली गाडी; भरावा लागला 1 लाख 60 हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 22:07 IST2025-02-05T22:05:37+5:302025-02-05T22:07:04+5:30
दंड भरल्यानंतर पोलिसांनी गाडी सोडली अन् नियम पाळण्याचा सल्ला दिला.

311 वेळा मोडले वाहतुकीचे नियम, जप्त झाली गाडी; भरावा लागला 1 लाख 60 हजारांचा दंड
Traffic Rules : ट्रॅफिक नियम मोडल्यास कार अथवा बाईकस्वारांकडून दंड आकारला जातो. पण, कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका स्कूटरस्वाराला 311 वेळा ट्रॅफिक उल्लंघन प्रकरणात तब्बल 1.6 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी तरुणाची गियरलेस स्कूटर जप्त केली होती, त्यानंतर त्याला हा दंड भरावा लागला. वाहतूक पोलिसांनी दंडाच्या पावत्या पाहिल्या, तेव्हा त्यांना धक्का बसला. अखेर सोमवारी शहर बाजारपेठ वाहतूक पोलिसांनी ही स्कूटर जप्त केली अन् चालकाला नोटीस बजावून थकीत दंड भरण्यास सांगितले.
'X' प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर करताना वाहतूक पोलिसांनी सांगितले की, स्कूटरच्या मालकाचा 3 फेब्रुवारीला शोध लागला आणि त्याच दिवशी पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केले. 4 फेब्रुवारी रोजी मालकाने 1,61,500 रुपये दंड भरल्यानंतरच वाहन सोडण्यात आले. त्या वाहनधारकाला वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.