व्हीलचेअरवर बसून सोने तस्करी करणा-या प्रवाशाला अटक

By admin | Published: May 30, 2017 01:54 PM2017-05-30T13:54:53+5:302017-05-30T13:54:53+5:30

नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिका-यांनी तस्करीच्या या पद्धतीचा पर्दाफाश केला.

Trafficking in a wheelchair seized a tourist carrying gold | व्हीलचेअरवर बसून सोने तस्करी करणा-या प्रवाशाला अटक

व्हीलचेअरवर बसून सोने तस्करी करणा-या प्रवाशाला अटक

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - सोन्याची तस्करी करण्यासाठी अपंग असल्याचे भासवून व्हीलचेअरचा वापर करणा-या एका 63 वर्षीय ज्येष्ठ नागरीकाला शनिवारी सीमा शुल्क अधिका-यांनी अटक केली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिका-यांनी तस्करीच्या या पद्धतीचा पर्दाफाश केला. व्हीलचेअरवर बसलेला प्रवासी आणि त्याच्या सहाय्यकाला सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक केली. 
 
दुबईवरुन येणारे दोन प्रवासी सोन्याची तस्करी करणार असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती असे सीमा शुल्क अधिका-यांनी सांगितले. प्रवासी व्हीलचेअरवर असल्याने तसे हे संवेदनशील प्रकरण होते. जेव्हा आम्ही व्हीलचेअरवर बसलेल्या प्रवाशाला चालून दाखवायला सांगितले तेव्हा तो आरामात चालत असल्याने आमचा संशय बळावला. चौकशीमध्ये आरोपीने त्याच्याकडे सोने असल्याची कबुली दिली. 
 
सोने ठेवण्यासाठी तो पँटच्या आतमध्ये एक वेगळी शॉर्ट घालायचा. सोन्याचे बार ठेवण्यासाठी त्याने ही शॉर्ट बनवून घेतली होती असे तपास अधिका-यांनी सांगितले. आरोपी पाँडीचेरी येथे राहणारा असून, तो चेन्नईला जाणार होता. व्हीलचेअरवर बसलेल्या प्रवाशाकडून अधिका-यांनी 3.5 किलो सोने जप्त केले. त्याची किंमत 93 लाख रुपये आहे. सीमा शुल्क कायद्याखाली दोघांनाही अटक केली आहे. स्मगलिगसाठी व्हीलचेअरचा वापर केल्याचे हे पहिले प्रकरण असल्याचे अधिका-यांनी सांगितले. 
 
तपासणीच्या नावाखाली व्हीलचेअरवर बसलेल्या प्रवाशांना त्रास न देण्याचे निर्देश अधिका-यांना दिलेले असतात. मागच्या गुरुवारी रियाधवरुन आलेला एक प्रवासी आणि विमानतळ कर्मचा-याला सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक झाली. रियाधवरुन आलेल्या प्रवाशाने 2.7 किलो सोने वॉशरुममध्ये विमानतळ कर्मचा-याच्या ताब्यात दिले. या सोन्याची किंमत 80 लाख रुपये होती. विमानतळ कर्मचारी हे सोने विमानतळाबाहेर काढणार होता. पण त्यापूर्वीच दोघांना अटक झाली. 
 
मुंबई विमानतळावरही सोने तस्करीचा प्रयत्न 
 
मागच्या महिन्यात मुंबई विमानतळावर विमानातून बेकायदेशीरपणे सोने आयात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश हवाई गुप्तचर कक्षाने (एआययू) केला असून त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रसाधनगृहाजवळ ठेवण्यात आलेले ५६ लाख रुपये किमतची १. ८६५ किलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी विमानतळावरील दोघा कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे.
 

Web Title: Trafficking in a wheelchair seized a tourist carrying gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.